घरदेश-विदेशमोबाईलमध्ये सेव्ह असणारा नंबर आधारकार्डचा नाही

मोबाईलमध्ये सेव्ह असणारा नंबर आधारकार्डचा नाही

Subscribe

मोबाईलच्या कॉन्टॅक्टलिस्टमध्ये आधारकार्डचा जो नंबर सेव्ह होत आहे, तो आधारकार्डचा नसल्याचे युआयडिएआयने आज ट्विटरवर स्पष्ट केले आहे. याबाबतीत टेलिफोन कंपनींनी हात वरती केले आहेत. तर, अखिलेश यादवने भाजपवर निशाना साधला आहे.

यूनिक आयडेटिंफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडिएआय) आज मोबाईलमध्ये आधारकार्डचे हेल्पलाईन नंबर सेव्ह होण्याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. मोबाईलमध्ये सेव्ह होणाऱ्या हेल्पलाईन नंबरचा आणि युआयडिएआयशी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. आपण कुठल्याही टेलिफोन कंपनीला आधारकार्ड हेल्पलाईन नंबर यूजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फिड करण्यास सांगितले नसल्याचेही युआयडिएआयने सांगितले आहे. गुरुवारपासून सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरु आहे.

काय सांगितले युआयडिएआयने?

युआयडिएआयने ट्विटरवर सांगितले की, यूजर्सच्या फोनमध्ये जो नंबर सेव्ह आहे, तो नंबर १८००-३००-१९४७ असा आहे. या नंबरचा युआयडिएआयशी काही संबंध नाही. यूजर्समध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे काम केले गेले असल्याचे समोर येत आहे. हा नंबंर लोकांच्या फोनमध्येच सेव्ह आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून हेल्पलाईन नंबर हा १९४७ असल्याचे युआयडिएआयने सांगितले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

टेलिकॉम कंपनीचे काय म्हणणे आहे?

याविषयी रिलांयस जिओचे प्रवक्त्यांनी त्यांना युजर्सच्या मोबाईलमध्ये फोन नंबर सेव्ह होण्यासंबंधी काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. तर भारताच्या सर्वात मोठ्या टेलिफोन कंपनींपैकी एअरटेल कंपनीने याविषयी तपासणी करत असल्याचे सांगत याविषयी लवकर प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले आहे.

अखिलेश यादवने भाजपवर साधला निशाना

युआयडिएआयने लोकांना जनजागृतीसाठी ट्विटरवर माहिती दिली. तर दुरीकडे अखिलेश यादवने याविषयी भाजपवर टिका केली आहे. त्यामध्ये त्यांनी इव्हीएम मशीनचा मुद्धा घेत, भाजपवर निशाना साधला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -