घरक्रीडारणजी ट्रॉफी सुरू होण्याआधीच कोरोनाची एन्ट्री, बंगाल टीमचे सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

रणजी ट्रॉफी सुरू होण्याआधीच कोरोनाची एन्ट्री, बंगाल टीमचे सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबईविरुद्धचा सराव सामना स्थगित...

क्रिकेट ऑस्ट्रेलियानंतर भारतीय क्रिकेट सामन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. रणजी ट्रॉफी सुरू होण्यासाठी फक्त १० दिवस शिल्लक असताना बंगालमधील टीमच्या सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. १३ जानेवारीपासून रणजी ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. परंतु ही स्पर्धो सुरू होण्याआधीचा कोरोनाने यामध्ये एन्ट्री घेतली आहे. बंगालच्या टीममधील खेळाडूंचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईविरूद्ध होणारे दोन दिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबे आणि टीम व्हिडिओचे निरिक्षक यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दुबेच्या जागी साईराज पाटीलचा मंबईच्या २० सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

दुबेने आतापर्यंत भारतासाठी एक वनडे आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या २८ वर्षीय खेळाडूला महाराष्ट्र आणि दिल्ली विरूद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबईच्या संघातून समावेश करण्यात आला होता. रणजीमध्ये कसोटी सामने खेळवले जातात. लीग सामने ४ दिवसांपर्यंत खेळवले जातात. तसेच सेमी फायनल आणि अंतिम सामने ५ दिवसांसाठी खेळवले जातात.

- Advertisement -

बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंच्या आरटी-पीसीआर चाचण्या केल्या

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सचिव स्नेहशिष गांगुली यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता बंगाल क्रिकेट असोसिएशनने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंच्या आरटी-पीसीआर चाचण्या केल्या आहेत. सुदीप चॅटर्जी, अनुस्तुप मझुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी, प्रदीप्ता प्रामाणिक, सुरजित यादव अशा सहा खेळाडूंची नावे असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचवेळी त्यांच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक सौरशीष लाहिरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

मुंबईविरुद्धचा सराव सामना स्थगित

कोरोनाची रूग्णसंख्या वाढली असता बंगाल आणि मुंबई संघातील सामने रद्द करण्यात आले आहेत. मात्र, बंगाल दुसऱ्या सराव सामन्यात भाग घेणार की नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. बंगाल क्रिकेटनेही सर्व स्थानिक स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबतच कोरोना महामारीची परिस्थिती पाहिली असता उद्या (मंगळवार) सर्वोच्च परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे.


हेही वाचा : IND vs SA 2nd Test: वॉन्डरर्समध्ये पाच भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला धुरळा, टॉपवर रनमशीन कोहली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -