घरक्रीडाक्रिकेटपटू दीपक चहर बांधणार ‘या’ BigBoss स्पर्धकाच्या बहिणीशी लग्नगाठ!

क्रिकेटपटू दीपक चहर बांधणार ‘या’ BigBoss स्पर्धकाच्या बहिणीशी लग्नगाठ!

Subscribe

चित्रपट विश्वाचा आणि क्रिकेट विश्वाचे कनेक्शन अनेक प्रकारे पाहिले जातो. अनेक बॉलिवूड सेलेब्सनी क्रिकेट दिग्गजांसोबत सात फेरे घेतल्याचे समोर आले आहे, तर काहींचे संबंध अजूनही नवीन आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची जोडी असो किंवा कथित जोडप्या अथिया शेट्टी आणि केएल राहुलचे नाते असो. क्रिकेट आणि मनोरंजनाच्या दुनियेचा हा समन्वय अनेकदा दिसून येतो. आता या यादीत क्रिकेटपटू दीपक चहरचे नावही समाविष्ट झाले आहे. अशी चर्चा आहे की दीपक चहर बिग बॉस ५ चा स्पर्धक असलेल्या सिद्धार्थ भारद्वाजची बहीण जयाला डेट करत आहे. इतकेच नाही तर ते दोघेही विवाहबधंनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. दीपक चहर त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. दीपक चहर चेन्नई सुपर किंग्जचाही एक भाग आहे. आयपीएल सामन्यादरम्यान, दीपकने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकले.

मात्र अशा चर्चा रंगताना दिसताय की, दीपक चहर जया भारद्वाजला डेट करत आहेत. ते एकमेकांबद्दल सिरीअस असून त्यांचे नातेसंबंध लग्नात बदलू शकतात. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपक चहर आणि जया यांचा लवकरच विवाह होणार आहे. इतकंच नाही तर २०२१ च्या आयपीएलनंतर ते साखरपुडा करणार आहेत. तर दुबईला होणाऱ्या आयपीएल मॅचसाठी जया ही दीपकसोबत जाणार असल्याची माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

- Advertisement -

जया ही सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ भारद्वाज VJ, मॉडेल आणि MTV Splitsvilla २ चे विजेता असून त्याने स्पर्धक साक्षी प्रधानसोबत हा शो जिंकला, त्यानंतर त्याला पाच लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. सिद्धार्थ भारद्वाजने टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस ५ मध्येही दमदार कामगिरी केली आहे. २०११ मध्ये झालेल्या या शोमध्ये सिद्धार्थ सेकंड रनर अप होता. त्यांनी फियर फॅक्टर खतरों के खिलाडी ६ मध्येही भाग घेतला. जया ही दिल्लीची असून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते. दीपक चहरची बहिण मालती चहर ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सिद्धार्थ बिग बॉस ५ आणि स्पिल्टिस्टव्हिला या शोमध्ये दिसला होता. दीपकने बांग्लादेश विरोधात ७ रन देत ६ विकेट घेतल्या होत्या. तर ICC ने त्याला T20 परफॉर्मेंस ऑफ द इयर हा अवॉर्ड दिला होता.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -