घरदेश-विदेशAfghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणारे कोर्टात हजर न झाल्यास थेट मृत्यूदंडाची शिक्षा,...

Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणारे कोर्टात हजर न झाल्यास थेट मृत्यूदंडाची शिक्षा, तालिबानचा इशारा

Subscribe

अमेरिकन सैन्याने माघारी घेताचं अफगाणिस्तान २० वर्षांनंतर पुन्हा एकदा तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले आहे. तालिबान्यांनी काबूल विमानतळाचा ताबा घेत दहशत पसरवायला सुरुवात केली. तर आत्तापर्यंत अनेक क्रुर आणि अमानवी कारवाया सुरु केल्या. अशातच अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची शेवटची तुकडीने देखील ३१ ऑगस्ट २०२१ ला माघार घेतली. त्यामुळे तालिबानने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. तालिबान दहशतवाद्यांनी हवेत बेछूट गोळीबार करत आनंद साजरा केला.

मात्र अमेरिकन सैन्याच्या शेवटी तुकटीने अफगाणमधून माघार घेताच तालिबान्यांनी पुन्हा आपल्या क्रुर कारवायांना  सुरु केल्या आहेत. तालिबानचा प्रवक्त्याने एअरपोर्टवर पत्रकार परिषद घेत, अमेरिकन सैन्याला मदत करणाऱ्या अफगाणी नागरिक कोर्टात हजर न झाल्यास त्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल असा इशारा दिला आहे. याप्रकरणी तालिबानी दहशतवाद्यांनी अनेक अफगाणी नागरिकांच्या घरी नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे तालिबानी दहशवाद्यांच्या नोटीसनंतरही अमेरिकेला मदत करणारे अफगाणी नागरिक कोर्टात हजर झाले नाही तर त्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे.

- Advertisement -

अफगाणी नागरिकांचा शेवटचा आसरा गेला

अमेरिकन सैन्याला ३१ ऑगस्टपर्यंत काबुल विमानतळ खाली करण्याचा इशारा तालिबानी दहशतवाद्यांनी दिला होता. यातच काही दिवसांपासून काबुल विमानतळावर आतंकवादी हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यांमध्य़े आत्तापर्यंत शेकडोहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले. अफगाणमध्ये तालिबान आणि इस्लामिक स्टेटची सुरु असलेली दहशत पाहता हजारो निष्पाण नागरिक हा देश सोडू पाहतायतं. मात्र या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग सध्या सापडत नाहीय. तालिबानी प्रवक्ता कारी यूसुफने अंतिम घोषणा करत सांगितले की, अखेर अमेरिकन सैन्याने काबुल विमानतळावरुन माघार घेतली असून अफगाणिस्तान आता पुर्णपणे स्वतंत्र्य झाला आहे.

मात्र अफगाणिस्तानमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना भारतीय हवाई दलाच्या विशेष विमाने भारतात आणण्यात आले. अफगाणी शीख, हिंदूंनाही भारतात आणण्यात आले. यामुळे जगभरातून मोदी सरकारचे कौतुक केले जातेयं. अमेरिकेच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातून आत्तापर्यंत सव्वा लाख नागरिकांचे रेस्क्यु करण्यात आले.

- Advertisement -

“तालिबान्यांनी महिलांना राजकारणात संधी देत सकारात्मक दृष्टीकोन आणला”, शाहिद आफ्रिदीचे तालिबान्यांसाठी उफाळून आले प्रेम

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -