घरक्रीडाधोनीची काश्मीरमध्ये पोस्टिंग

धोनीची काश्मीरमध्ये पोस्टिंग

Subscribe

महेंद्रसिंह धोनीला लष्कराने लेफ्टनंट कर्नलपद दिले असून तो काश्मीरमध्ये पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची काश्मीरमध्ये सध्या पोस्टिंग करण्यात आली आहे. धोनीला लेफ्टनंट कर्नल पदी नेमणूक केली असून धोनी काश्मीरमध्ये पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे. महेंद्रसिंह धोनीची हा आता पुन्हा एकदा लष्काराच्या गणवेशात दिसणार आहे.

सूत्रांनी असे सांगितले आहे की, धोनीच्या लष्करात जाण्याच्या निर्णयामुळे युवकांमध्ये एक जागरूकता निर्माण होणार आहे. धोनीचे ही हेच मत होते. या अगोदर त्याला २०११ साली लष्कारात सन्मान देण्यात आला होता. तसेच २०१५ साली आग्रा येथे पॅराशूट जंपिंगचे प्रशिक्षण धोनीने यशस्वीरित्या पूर्ण केले होते. लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी हा ३१ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात १०६ टी.ए.बटालियनमध्ये सामील होणार आहे. या कालावधीत तो काश्मीर खोऱ्यात असून व्हिक्टर फोर्ससोबत प्रशिक्षण घेणार आहे. तसेच तो तिथे पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाच्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यासाठी रविवारी निवड समिती संघाची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा होण्यापूर्वीच धोनीने विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छूक नसल्याचे बीसीसीआयला सांगितले होते. त्यामुळे या दौऱ्यात धोनीच्या जागी क्रिकेटपटू रिषभ पंत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -