घरक्रीडामॅरेडोना फुकटात बनणार अर्जेंटिनाचा 'कोच'?

मॅरेडोना फुकटात बनणार अर्जेंटिनाचा ‘कोच’?

Subscribe

फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यात अर्जेंटिना संघांचा फ्रान्सकडून ४-३ अशा फरकाने दारून पराभव झाला. ज्यामुळे त्यांना विश्वचषकातून बाहेर जावे लागले हा पराभव अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना याच्या जिव्हारी लागला आणि त्याने भावनिक होऊन अर्जेंटिना संघांला विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला

विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतून अर्जेंटिना संघांला फ्रान्सने बाहेर पाठवल्यावर, अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाने संघांला विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यात अर्जेंटिना संघांचा फ्रान्सकडून ४-३ अशा फरकाने पराभव झाल्यामुळे त्यांना विश्वचषकातून बाहेर जावे लागले. ही गोष्ट जगभरातील अर्जेंटिना फॅन्सच्यातर जिव्हारी लागली. मात्र त्याचसोबत अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना याच्याही मनाला ही गोष्ट चांगलीच लागली. त्यामुळेच त्याने भावनिक होऊन अर्जेंटिना संघांला विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला. व्हेनेझुएला या टी व्ही शोमध्ये त्याने हे विधान केले आहे. शोमध्ये मॅराडोनाने सांगितले की ” होय, मला अर्जेंटिना संघांला विनामूल्य प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे, या बदल्यात मी काहीही मागणार नाही”.

डिएगो मॅराडोना हा अर्जेंटिनाचा एक प्रसिद्ध खेळाडू असून त्याला फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू मानल जात. त्याने आपल्या अप्रतिम खेळामुळे अर्जेंटिनाला फुटबॉल क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. १९७७ ते १९९४ च्या काळात मॅराडोना हा अर्जेंटिना संघांकडून खेळला असून त्याने ९१ मॅचेस मध्ये ३४ गोल केले आहेत. मैदानावर अर्जेंटिना संघांला प्रसिद्धी मिळवून दिल्यानंतर अलीकडच्या काळात मॅराडोना मैदानाबाहेर राहून संघांला चीअर-अप करताना आपल्याला दिसतो. गेले बरेच अर्जेंटिना संघांच्या सामन्यांना तो हजेरी लावताना आपल्याला दिसून येतो. सध्या रशियात सुरू असेलेल्या विश्वचषकातील अर्जेंटिनाच्या प्रत्येक मॅचला मॅराडोनाने हजेरी लावली असून त्याचा उत्साह पाहण्याजोगा होता. अर्जेंटिनाविरूद्ध नायजेरिया हा सामना अत्यंत चुरशीचा झाला त्यामुळे त्या सामन्यानंतर मॅराडोनाला इतका ताण आला की त्याला सामना झाल्यावर सहाय्यकांच्या मदतीने बाहेर नेण्यात आले.

- Advertisement -
agres maradona
अर्जेंटिनाविरूद्ध नायजेरिया सामन्यादरम्यान मॅरोडोना

बाद फेरीच्या सामन्यात अर्जेंटिना संघांचा फ्रान्सकडून ४-३ अशा फरकाने पराभव झाला खरा मात्र सामना अतिशय अटीतटीचा झाल्याने सर्वच अर्जेंटिना फॅन्सच्या हृदयाचे ठोके चुकले होते. पराभवानंतर अर्जेंटिनाला स्पर्धेबाहेर जावे लागले असता मॅराडोनाने सांगितलेकी “लोकांना वाटते की मी आनंदी आहे, परंतु माझे हृदय जड झाले आहे, आम्ही केलेले सगळे प्रयत्न वाया गेले”

argentina vs france
अर्जेंटिना विरूद्ध मॅक्सीको सामन्यातील एक क्षण

मॅराडोनाने केलेल्या या विधानानंतर त्याचे आपल्या संघावरील आणि देशावरील प्रेम पुन्हा एकदा दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -