घरक्रीडाअनुभवी खेळाडूंनी आफ्रिदीला चांगली वागणूक दिली नाही

अनुभवी खेळाडूंनी आफ्रिदीला चांगली वागणूक दिली नाही

Subscribe

शोएब अख्तरची पाठराखण

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने ‘गेम चेंजर’ नामक आत्मचरित्रात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंवर बरीच टीका केली आहे. मला सिनियर्सनी चांगली वागणूक दिली नाही असे त्याने या पुस्तकात लिहिले आहे. पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जावेद मियांदाद यांनी १९९९ मध्ये भारताविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्याआधी मला फलंदाजीचा सराव करू दिला नाही, असे एक उदाहरण त्याने आत्मचरित्रात दिले आहे.

आफ्रिदीने केलेल्या या टीकेमुळे त्याच्यावरच अनेक लोक टीका करत आहेत. मात्र, त्याचा माजी सहकारी शोएब अख्तरने त्याची पाठराखण केली आहे. आफ्रिदीला त्याच्या कारकिर्दीत अनुभवी आणि सिनियर खेळाडूंनी चांगली वागणूक दिली नाही, असे अख्तरने सांगितले.

- Advertisement -

मला वाटते की शाहिद आफ्रिदी आपल्या पुस्तकात अजून बर्‍याच गोष्टी लिहू शकला असता. आफ्रिदीला त्याच्या कारकिर्दीत अनुभवी खेळाडू आणि सिनियर्सनी चांगली वागणूक दिली नाही. ते त्याच्यासोबत कशाप्रकारे वागायचे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि त्याने जे काही लिहिले आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. सिनियर्सनी आफ्रिदीसोबतच मलाही चांगली वागणूक दिली नाही. काही वर्षांनंतर १० अनुभवी खेळाडूंनी माझी आणि आफ्रिदीची माफी मागितली, असे अख्तर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -