घरक्रीडाFIFA 2018 : कमजोर संघाची दमदार खेळी

FIFA 2018 : कमजोर संघाची दमदार खेळी

Subscribe

मेक्सिकोने जर्मनीचा केलेला धक्कादायक पराभव तर स्पेन, अर्जेंटीना यांचे बरोबरीत सुटलेले सामने आणि आता पोलंड आणि कोलंबियाची हार यामुळे स्पर्धेतील छोट्या संघाचे वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले.

आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात फुटबॉलमधील बलाढ्य संघांकडून खास कामगिरी होताना दिसत नाहीये. उलट दुबळ्या संघांचे वर्चस्व स्पर्धेत दिसून येत आहे. जर्मनी, स्पेन, अर्जेंटीना या संघांपाठोपाठ आता पोलंड आणि कोलंबियासारख्या संघानाही या नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. काल झालेल्या सामन्यात पहिल्यांदा बलाढ्य कोलंबियाला जपानने पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यात जगात ८व्या स्थानावरील पोलंडला सेनेगलने हारवत विश्वचषकातील मोठ्या संघावरील छोट्या संघाचे वर्चस्व दाखवून दिले.

कोलंबिया विरुद्ध जपान

फिफा विश्वचषकाच्या एच गटातील कोलंबियाविरुद्ध जपान अशा सामन्यात जपानने कोलंबियावर २-१ ने विजय मिळवला आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच ६ व्या मिनिटाला जपानकडून कागावाने पेनल्टीचा उपयोग करत गोल केला आणि जपानला सामन्यात आघाडी मिळवून दिली. यानंतर हाफ टाईम आधीच कोलंबियाकडून क्विंटेरोने ३९ व्या मिनिटाला गोल करत संघांला सामन्यात बरोबरी साधून दिली. हाफ टाईमनंतर अटीतटीचा चाललेला सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच जपानच्या ओसाकोने ७३ व्या मिनिटाला गोल करत जपानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
या सामन्यासोबतच जपानने एक नवा विक्रम केला आहे. विश्वचषकाच्या स्पर्धेत दक्षिण अमेरिकन उपखंडातील देशाला पराभूत करणारा जपान हा पहिला आशियाई देश ठरला आहे.

- Advertisement -
japan team
गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना जपानचा संघ

सेनेगल विरूद्ध पोलंड

जगातिक क्रमवारीत ८व्या स्थानावर असणाऱ्या पोलंडला सेनेगलने हरवले असून विश्वचषकात विजय मिळवणारा सेनेगल हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलचा सामन्यावर दबदबा दिसून येत होता. ३७ व्या मिनिटाला पोलंडच्या सिओनेकने स्वयंगोल करत सेनेगलला सामन्यात आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमनंतर ६० व्या मिनिटाला सेनेगलच्या नियंगने गोल करत सामना आपली पकड अजून मजबूत केली. ८५ व्या मिनीटाला पोलंडकडून क्रायचोवीकने गोल केला मात्र त्यानंतर पोलंडला एकही गोल करता आला नाही आणि सामना सेनेगलने जिंकत एच गटात दुसरे स्थान पटकावले.

snegal match
सेनेगल विरूद्ध पोलंड मॅचमधील एक क्षण

जर्मनीचा मेक्सिकोने केलेला धक्कादायक पराभव तर स्पेन, अर्जेंटीना यांचे बरोबरीत झालेले सामने आणि आता पोलंड आणि कोलंबियाची हार याने स्पर्धेतील छोट्या संघाचे वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -