घरICC WC 2023Glenn Maxwell : मॅक्सवेल बनला 'रन मशिन'; त्याच्या सर्वश्रेष्ठ खेळीने केलेले 10...

Glenn Maxwell : मॅक्सवेल बनला ‘रन मशिन’; त्याच्या सर्वश्रेष्ठ खेळीने केलेले 10 विक्रम जाणून घ्या

Subscribe

मुंबई : विश्वचषक 2023 मधील मंगळवारी(7नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवल्या गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाकडून मिळालेल्या 292 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 91 धावांवर आपल्या 7 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकले असे वाटत होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल संघासाठी रन मशीन बनला. त्याने कर्णधार पॅट कमिन्ससोबत विक्रमी भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. (Glenn Maxwell became a run machine Know his top 10 innings records)

हेही वाचा – AUS vs AFG : मॅक्सवेल एकाकी झुंजला अन् विजय खेचून आणला; नाबाद 201 धावांची खेळी

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट पडल्यानंतर मॅक्सवेलने 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकार पाऊस पाडत 201 धावा केल्या. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकात 293 धावा करत अफगाणिस्तानचे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची ऐतिहासिक खेळी करताना काही विक्रम आपल्या नावावर आहेत. त्याबद्दल 10 मुद्द्यात जाणून घेऊया…

- Advertisement -
  • ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध 201* धावा केल्या. अशाप्रकारे, तो ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला फलंदाज बनला आहे. शेन वॉटसनने याआधी बांगलादेशविरुद्ध 2011 मध्ये मीरपूर येथे नाबाद 185 धावांची सर्वोच्च पारी खेळली होती.
  • एकदिवसीय सामन्यात मॅक्सवेलआधी पाकिस्तानच्या फखर झमानने 2021 मध्‍ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 193 धावांची खेळी केली होती. आता मॅक्सवेलने त्यालाही मागे टाकले आहे.
  • मॅक्सवेल नंबर 3 किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना द्वीशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. 2009 मध्ये बांगलादेशविरुद्ध चार्ल्स कोव्हेंट्रीची 194* ही नॉन-ओपनरद्वारे यापूर्वीची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या होती. मॅक्सवेलच्या आधी लिस्ट ए क्रिकेटमध्ये टॉप-4 क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाने द्विशतक लावले नव्हते. दरम्यान मॅक्सवेल अफगाणिस्तानविरुद्ध नंबर सहावर फलंदाजी करण्यासाठी आला होता.
  • एकदिवसीय विश्वचषकात द्विशतक लगावणारा मॅक्सवेल तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ख्रिस गेलने (2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 219*) आणि मार्टिन गप्टिलने (2015 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 237*) खेळी केली आहे.
  • मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी अफगाणिस्तानविरुद्ध 202 धावांची भागिदारी केली. यासह दोघांनी सातव्या विकेटसाठी मोठ्या भागिदारीची नोंद केली. याआधी जॉस बटलर आणि आदिल रशीद यांच्यात 2015 मध्ये बर्मिंगहॅममध्ये न्यूझीलंडविरुद्ध 177 धावांची भागीदारी झाली होती.
  • मॅक्सवेलने 128 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. याआधी भारताच्या विकेटकीपर फलंदज इशान किशन याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूत द्विशतक केले होते.
  • ऑस्ट्रेलियाने आपली सातवी विकेट पडल्यानंतर 202 धावा केल्या, ज्या कोणत्याही संघापेक्षा एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. 2007 मध्ये आफ्रिका इलेव्हनने आशिया इलेव्हनविरुद्ध सात विकेट पडल्यानंतर 196 धावा केल्या होत्या.
  • अफगाणिस्तानकडून मिळालेल्या 292 धावांचा ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला. एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची ही सर्वोच्च कामगिरी आहे. याआधी 1996 मध्ये चेन्नई येथे झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 287 धावांचा पाठलाग केला होता.
  • मॅक्सवेलने कमिन्ससह सातव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागीदारी केली. यात त्याने वैयक्तिक 179 धावांचे योगदान दिले. कमिन्सने 68 चेंडूंचा सामना करताना 12 धावा केल्या. यावेळी 11 अतिरिक्त धावा आल्या.

हेही वाचा – टाइम आऊट प्रकरणाचा वाद Sportsmanship ला ठेच पोहोचवणारा; मैदानात आणि बाहेरही

  • मॅक्सवेलचे 8.61 टक्के धावांचे योगदान हे पुरुषांच्या एकदिवसीय विकेटमध्ये एका व्यक्तीने दिलेले सर्वोच्च योगदान आहे. दिल्लीत नेदरलँड्सविरुद्ध 103 धावांची भागीदारी करताना मॅक्सवेलने 88.35 टक्के सहाय्यांसह चांगली कामगिरी केली. यावेळी त्याने 91 धावा केल्या होत्या.
  • मॅक्सवेलची धावसंख्या (201*) आणि ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या (मिचेल मार्शच्या 24) मधील फरक 177 धावांचा होता. एकदिवसीय डावातील अव्वल दोन खेळाडूंमध्ये फक्त दोनदाच मोठा फरक झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -