घरICC WC 2023AUS vs AFG : मॅक्सवेल एकाकी झुंजला अन् विजय खेचून आणला; नाबाद...

AUS vs AFG : मॅक्सवेल एकाकी झुंजला अन् विजय खेचून आणला; नाबाद 201 धावांची खेळी

Subscribe

विश्वचषक 2023 मधील आता उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

मुंबई : विश्वचषक 2023 मधील मंगळवारी(7नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवल्या गेला. सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियापुढे 292 धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 73 धावांत ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतले. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचे आणखी दोन खेळाडू काहीशाच धावा करून तंबूत परतले. तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती ही 7 गडी बाद 125 धावा अशी असताना फलंदाजीसाठी उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झूंज देत सामना अटीतटीच्या स्थितीपर्यंत आणून सोडला नाही तर त्याने विश्वचषकात 201 धावांची खेळी करत अफगाणिस्तानवर विजय मिळवला. (AUS vs AFG  Maxwell single-handedly pulls off the win An innings of 201 not out)

विश्वचषक 2023 मधील आता उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत आठ विजयासह उपांत्य फेरीत पोहचला असून, त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत आहे. दरम्यान आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघात सामना खेळविल्या गेला. यामध्ये अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील ही अफगाणिस्तानची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. ही धावसंख्या उभारण्यात अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने 143 चेंडूत 129 धावा केल्या तर राशिद खानने 18 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली. अखेरीस इब्राहिम आणि रशीद यांच्यात सहाव्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी झाली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात 64 धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली.

- Advertisement -

हेही वाचा : टाइम आऊट प्रकरणाचा वाद Sportsmanship ला ठेच पोहोचवणारा; मैदानात आणि बाहेरही

ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात

291 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ट्रेव्हीस हेड यांने खाते न उघडताच तो तंबूत परतला. नवीन उल हक च्या चेंडूवर तो यष्टीरक्षक अलीखिलच्या हाती झेल देऊन बाद झाला. पुढे वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी फलंदाजी केली पण काही काळासाठीच. कारण, 11 चेंडूत 24 धावा करून मिचेल मार्शही बाद झाला. तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही 43 वर दोन गडी बाद अशी होती. अशी स्थिती असतानाच एकएक करून सात गडी बाद झाले. तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही 20 षटकात 98 धावांवर सात गडी बात अशी होती.

- Advertisement -

हेही वाचा : भारतीय संघाला क्षेत्ररक्षणात सुपरमॅन बनवणारे ‘महागुरू’ कोण? एकेकाळी मुलांना शिकवायचे गणित 

सात फलंदाजानंतर मैदानात अवतरले ‘तुफान’

मात्र, अफगाणिस्तान संघाला आता सामना करायचा होता तो विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याचा. सात गडी बाद 98 धावा असताना मैदानात उतरलेल्या मॅक्सवेलने 2023 च्या विश्वचषकात नाबाद 201 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. एवढेच नव्हे तर आता ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत पोहचला असून, त्यांनी आपला दरारा कायम ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -