घरICC WC 2023टाइम आऊट प्रकरणाचा वाद Sportsmanship ला ठेच पोहोचवणारा; मैदानात आणि बाहेरही

टाइम आऊट प्रकरणाचा वाद Sportsmanship ला ठेच पोहोचवणारा; मैदानात आणि बाहेरही

Subscribe

विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या दोन संघामध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना खेळविल्या गेला.

नवी दिल्ली : विश्वचषक 2023 मधील सोमवारचा दिवस श्रीलंकेसाठी वाईट ठरला तर क्रिकेटप्रेमींसाठी नाट्यमय घडामोडी घेऊन आला होता. कारण, श्रीलंका आणि बांगलादेश संघा दरम्यान झालेल्या दिल्ली येथील सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊटमुळे बाद करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या पारीत त्याच अँजेलो मॅथ्यूजने शाकीब अल हसनचा बळी घेऊन मनगटावर बोट ठेवत टाइम आऊटचा इशारा केला. या घडामोडी येथेच थांबल्या नाहीत तर मैदानात आणि मैदानाबाहेरही नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. (Controversy over time-out issue affecting sportsmanship On and off the field)

विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या दोन संघामध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना खेळविल्या गेला. या सामन्या दरम्यान श्रीलंकेचा खेळाडू अँजलो मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता बाद झाला. टाइम आऊटमुळे त्याला बाद देण्यात आले होते. सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज खेळण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळी ही घटना घडली. सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज खेळण्यासाठी मैदानात आला. त्याने स्ट्राईक घेतली, पण हेल्मेटचा भाग तुटल्याचे लक्षात आले. त्यामुळे मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवले. यासाठी दोन मनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने पंचाकडे बादची दाद मागीतली त्यामुळे त्याला बाद देण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

- Advertisement -

मॅथ्यूज बोलण्याचा प्रयत्न करत होता पण…

शाकिब अल हसन याच्या अपीलनंतर पंचानी मॅथ्यूजला बाद घोषित केले. त्यानंतर मॅथ्यूज पंच मारायस इरास्मस आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याशी चर्चा केली. उशिराचे त्याने स्पष्टीकरणही दिले. परंतू पंचानी ते ऐकले नाही. त्यानंतर मॅथ्यूज हा शाकिबशीही बोलण्यासाठी त्याच्याकडे गेला त्याला त्याची अपील मागे घेण्यासाठी विनंती करत होता पण, शाकीबने अपील मागे घेतले नाही आणि मॅथ्यूजशी हात मिळविण्यासही नकार दिला. त्यानंतर मॅथ्यूजने मैदान सोडले.

- Advertisement -

हेही वाचा : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; साखळी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन, पण…

असा घेतला मॅथ्यूजने बदला

आधीच्या डावात अँजेलो मॅथ्यूजसोबत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण श्रीलंकन संघाच्या मनात चीड होतीच. तीच चीड मनात घेऊन सगळे खेळाडू मैदानात उतरले होते. यानंतर जेव्हा शाकीब अल हसन फलंदाजी करत होता त्याला गोलंदाजी करण्यासाठी मुद्दामहून अँजेलो मॅथ्यूजने अट्टाहास पकडला. त्याने शाकिबला गोलंदाजी केलीही आणि फक्त गोलंदाजीच केली नाही तर त्याने चक्क शाकिबला बाद केले. यावेळी मॅथ्यूजने शाकिब बाद करून त्याला वेळेची आठवण करून देत हातातील घड्याळाकडे इशारा केला आणि मैदान सोडण्याचे संकेत दिले.

हेही वाचा : रायगड जिल्ह्यात सुपारी संशोधन केंद्र उभारणार; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा

दोन्ही संघातील खेळाडूनी हस्तांदोलन न करताच सोडले मैदान

सामना कोणत्याही संघात असो, आणि विजय मिळो वा पराजय परंतू सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकाच्या संघातील खेळाडूंसोबत हस्तांदोलन करून मैदान सोडतात. परंतू सोमवारी दिल्लीतील मैदानावर बांगलादेश आणि श्रीलंकेच्या सामन्यात हे बघायला मिळाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -