घरक्रीडाएच. टी. भंडारी चॅलेंज ट्रॉफी

एच. टी. भंडारी चॅलेंज ट्रॉफी

Subscribe

ठाण्याच्या श्री माँ विद्यालयाचा डावखुरा फिरकी गोलंदाज आयुष मोगलने मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे होणार्‍या आंतरशालेय एच. टी. भंडारी चॅलेंज ट्रॉफी स्पर्धेत ठाण्याच्याच आर. एच. आयडीएल शाळेविरुद्ध हॅट्ट्रिकसह ८ विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने ५ षटकांत १७ धावा देत ८ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी संघाचा डाव ९.२ षटकांत अवघ्या २३ धावांत संपुष्टात आला.

चर्चगेटच्या ओव्हल मैदानात होत असलेल्या या स्पर्धेतील श्री माँ विद्यालयाविरुद्धच्या साखळी सामन्यात आर. एच. आयडीएलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आयुष मोगलने पहिल्याच षटकात आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवली. त्याने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फारुख खानला त्रिफळाचीत केले. आयुषने आयडीएलच्या ७ फलंदाजांना त्रिफळाचीत तर एका फलंदाजाला पायचीत केले. आयडीएलच्या सहा फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही.

- Advertisement -

तर श्री माँ विद्यालय संघाच्या आशिष दिघोले आणि वेदांत सिंग या सलामीविरांनी २४ धावांचे लक्ष्य अवघ्या २.४ षटकांत पूर्ण करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -