घरक्रीडाIPl Retention : मुंबईने रिटेन न केल्याने भावुक हार्दिक पांड्या; शेयर केला...

IPl Retention : मुंबईने रिटेन न केल्याने भावुक हार्दिक पांड्या; शेयर केला भावनिक व्हिडिओ

Subscribe

मुंबई इंडियन्सकडून पांड्या बंधूंपैकी कोणालाच रिटेन करण्यात आले नाही

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनच्या पूर्वसंध्येलाच प्रत्येक संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र मुंबई इंडियन्सकडून पांड्या बंधूंपैकी कोणालाच रिटेन करण्यात आले नाही. हार्दिक पांड्याने २०१५ पासून त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आणि तो मुंबईच्या संघाचा महत्वाचा भाग राहिला होता. मात्र हा अष्टपैलू खेळाडू कदाचितच आयपीएलच्या पुढील हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळू शकतो. हार्दिक पांड्याने देखील याबाबतीत इशारा केला आहे की कदाचित तो पुन्हा संघात परतू शकत नाही. मुंबईला स्वतःच्या एकतर्फी खेळीने कित्येक सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला रिटेन न केल्याने तो खूप दुःखी आहे. दरम्यान हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेयर करून मुंबई इंडियन्स सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हार्दीकने व्हिडिओ सोबत लिहले की, “मी या आठवणींना आयुष्यभर कायमस्वरूपी सोबत ठेवणार आहे. हे सगळे क्षण जीवनभर माझ्या सोबत साठवून ठेवेन. मी जे मित्र बनवले आहेत, लोक, चाहते, मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. मी एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणून देखील खूप मोठा झालो आहे”.

- Advertisement -

पांड्याने आणखी म्हंटले की, “मी एक युवा खेळाडू म्हणून एक मोठे स्वप्न घेऊन इथपर्यंत आलो होतो. आम्ही सोबतच जिंकलो, सोबतच हरलो आणि सोबतच लढलो आहे. या संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला माझ्या हृदयात एक खास जागा आहे”. त्याने सांगितले सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो. पण मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील.

- Advertisement -

२८ वर्षीय हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये फक्त मुंबईच्या फ्रँचायझीकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना २७.३३ च्या सरासरीने १४७६ धावा बनवल्या आणि ४२ बळी घेतले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या मागील सत्रात त्याचे प्रदर्शन निराशाजनक राहिले होते. त्याने १४.११ च्या सरासरीने फक्त धावा केल्या होत्या. तर मागील सत्रात त्याने एकदाही गोलंदाजी केली नव्हती.


हे ही वाचा: http://Ind vs Nz 2nd test : वानखेडेवर भारताचा फलंदाजीचा निर्णय, Playing XI काय ? कोणाला संधी, कोणाला डच्चू


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -