घरक्रीडाHarsha Bhogle Viral Video: 'त्या' मुलाखतीदरम्यान हर्षा भोगलेंचा मोबाईल पडला, आवाज ऐकून...

Harsha Bhogle Viral Video: ‘त्या’ मुलाखतीदरम्यान हर्षा भोगलेंचा मोबाईल पडला, आवाज ऐकून चाहते चिंतेत; पाहा नेमकं काय घडलं?

Subscribe

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले इन्स्टाग्रामवर एका लाईव्ह चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी चर्चा करत असतानाच अचानक त्यांचा मोबाईल खाली पडला. त्यानंतर हर्षा भोगलेंचा येणारा आवाज ऐकता त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) १५ वे पर्व शनिवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे अनेक क्रिकेट समीक्षक आणि खेळाडू सोशल मीडियावर चर्चा करताना पाहायला मिळत आहे. अशातच भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले हे यंदाच्या आयपीएलसंदर्भात चर्चा करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ही चर्चा सुरू असताना अचानक हर्षा भोगले यांचा मोबाईल खाली पडला. यावेळी हर्षा भोगलेंचा आवाज ऐकून त्यांच्यावर कोणी हल्ला केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला. परंतु हा एक केवळ ‘प्रोमो’ असल्याचं हर्षा भोगले यांच्या पत्नी अनिता भोगले यांनी स्पष्ट केलं.

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले इन्स्टाग्रामवर एका लाईव्ह चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी चर्चा करत असतानाच अचानक त्यांचा मोबाईल खाली पडला. त्यानंतर हर्षा भोगलेंचा येणारा आवाज ऐकता त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला. शिवाय मुलाखत घेणाराही वारंवार हर्षा भोगले यांना आवाज देत होता. परंतु समोरून उत्तर येत नव्हतं. त्यामुळं हा लाईव्ह कार्यक्रम पाहणारे चाहते चिंता व्यक्त करू लागले होते. हर्षा भोगले यांचा हा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

इन्स्टाग्रामवर लाईव्हमध्ये सूत्रसंचालकाने हर्षा भोगले यांना आयपीएलमध्ये नेमका कोणता संघ सर्वाधिक मजबूत संघ म्हणून पुढे येईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर हर्षा भोगले उत्तर देत होते. मात्र यावेळी अचानक त्यांचा फोन खाली पडला आणि पुसटशी इमेज दिसू लागली. त्यावेळी कोण आहे? काय झालं? कुठून आले आहेत? असं हर्षा भोगले म्हणत असल्याचं या व्हिडीओत ऐकू येत होतं. या प्रकाराने सूत्रसंचालकही काही काळ गोंधळून गेला. हर्षा सर, कदाचित तुमच्या हातून फोन खाली पडलाय? असं तो म्हणत होता. यानंतर हे लाईव्ह बंद करण्यात आलं.

- Advertisement -

या सर्व प्रकारानंतर हे लाइव्ह पाहणारे चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र अखेर यावर हर्षा भोगले यांनी उत्तर देत काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं म्हटलं. हर्षा भोगले यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी “मी ठीक आहे. तुम्हाला मी खूप चिंतेत टाकलं याबद्दल क्षमा असावी. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजी आणि प्रेमासाठी आभार. मला वाटलं होतं त्यापेक्षाही हे जास्त व्हायरल झालं. ही देखील माझ्यासाठी शिकवण आहे. यामधून वेगळा अर्थ निघणं अपेक्षित होतं, पण माफी असावी”, असं हर्षा भोगले यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. तसंच या व्हायरल व्हिडीओवर हर्षा भोगले यांच्या पत्नी अनिता भोगले यांनीही स्पष्टीकरण दिलं असून, मित्रहो, हर्ष भोगले ठीक आहेत. हा केवळ प्रोमो असल्याचं म्हटलं.


हेही वाचाः PAK-W vs ENG-W: इंग्लंडचा पाकवर दणदणीत विजय, भारताला मागे टाकत चौथ्या स्थानावर घेतली झेप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -