घर क्रीडा IBSA World Games 2023 : भारतीय अंध महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास;...

IBSA World Games 2023 : भारतीय अंध महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाचा पराभव केला अन्…

Subscribe

IBSA World Games 2023 : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने (Indian Blind Womens Cricket Team) आयबीएस वर्ल्ड गेम्सच्या (IBSA World Games 2023) अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंध महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा 163 धावांनी पराभव करत इतिहास रचला (Makes History)  आहे. विशेष म्हणजे अंध क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत धडक मारणारा हा पहिला संघ ठरला आहे. (IBSA World Games 2023 Indian Blind Womens Cricket Team Makes History Defeated Australia and)

हेही वाचा – Chess World Cup 2023 Final Result: आर प्रज्ञानानंद याचं स्वप्न भंगलं; कार्लसन ठरला विश्वविजेता

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची कर्णधार वर्षा उमापती हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. भारताने 6 व्या षटकांच्या शेवटच्या चेंडूवर आपली पहिली विकेट गमावली. सलामीवीर बी हंसडा बाद झाल्यानंतर एस दास आणि दीपिका टीसी दोघेही भारताचा डाव पुढे नेतील अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु दीपिका टीसीही धावबाद झाली. मात्र भारताकडून जी नीलप्पा आणि एस दास यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारतीय अंध महिला संघाने 245 धावांचा डोंगर उभा केला.

भारताकडून मिळालेल्या 246 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया लक्ष्याचा पाठलाग सहज करेल असे वाटत असताना सलामीवीर सीलुईस बाद झाली. तिला प्रियाने भागीदारी मोडीत काढत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर ऑस्ट्रेलिया अंध महिला संघाने आपल्या विकेट झटपट गमावल्या. त्यामुळे त्यांची अवस्था 35 धावांवर 4 विकेट अशी झाली होती. भारतीय महिला गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा 163 धावांनी पराभव करत अंतिम फेरी धडक मारली आणि इतिहास रचला. येत्या उद्या (26 ऑगस्ट) भारतीय अंध महिला संघाला इंग्लंडविरुद्ध जेतेपदाचा सामना खेळायचा आहे. त्यामुळे भारतीय अंध महिला संघ पुन्हा एकदा इतिहास रचणार का?  याकडे भारतीय क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -