घरक्राइमDonald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची नाट्यमयरित्या अटक आणि 20...

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची नाट्यमयरित्या अटक आणि 20 मिनिटांत सुटका

Subscribe

2020 च्या जॉर्जिया निवडणुकीच्या निकालात हेराफेरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये ट्रम्प यांनी काल आत्मसमर्पण केले. मात्र, 20 मिनिटांत ट्रम्प यांची दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

जॉर्जिया : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडतात. राष्ट्राध्यक्ष असताना देखील त्यांच्यामुळे वाद निर्माण झाले होते. वाद निर्माण करून चर्चेत राहणे याची ट्रम्प यांना सवयच आहे की काय, असे म्हणावे लागेल. काल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) देखील असाच काहीना नाट्यमय किस्सा ट्रम्प यांनी घडवून आणला आहे. 2020 च्या जॉर्जिया निवडणुकीच्या निकालात हेराफेरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये ट्रम्प यांनी काल आत्मसमर्पण केले. त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांकडून त्यांना अटक करण्यात आली आणि फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये काही मिनिटांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र, 20 मिनिटांत ट्रम्प यांची दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. यानंतर ते न्यू जर्सीला रवाना झाले. त्यामुळे नाट्यमय घडामोडी सर्वच जण गोंधळात सापडले. तर ट्रम्प आत्मसमर्पण करणार असल्याने पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Former US President Donald Trump was dramatically arrested and released within 20 minutes)

हेही वाचा – कोविड बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपआयुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स, आज होणार चौकशी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने तुरुंगाच्या बाहेर जमून घोषणाबाजी करत होते. या वर्षी ट्रम्प यांची आत्मसमर्पण करण्याची काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील चार वेळा माजी राष्ट्रपतींनी त्यांच्यावरील गुन्हेगारी आरोपांसंदर्भात स्थानिक किंवा फेडरल अधिकार्‍यांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अन्य 18 जण देखील 2020 च्या निवडणूकीच्या निकालात फेरफार करण्याच्या आरोपात दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अन्य 18 जणांनी सुद्धा काल तुरुंगात आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. तर ट्रम्प यांच्या कारकिर्दीत व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ असलेले मार्क मेडोज यांनी या प्रकरणात स्वतःला पोलिसांकडे सोपविले असल्याचे सांगितले आहे. तर 2024 च्या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार असतील, त्यामुळे त्यांची वारंवार न्यायालयात हजर राहण्याची अत्यंत कमी शक्यता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisement -

तर या घटनेमुळे ट्रम्प समर्थक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. हे सर्व काही राजकारणाचा एक भाग असून ट्रम्प यांच्यावर राजकीय सुडापोटी हे आरोप करण्यात आले असून अमेरिकेच्या आधुनिक इतिहासासाठी आणि अमेरिकेच्या लोकशाहीसाठीची ही सर्वात घातक गोष्ट आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -