घरICC WC 2023World Cup 1996: भारताचा विजय अन् पाकिस्तानी चाहत्यानं स्वत:वर झाडली गोळी; जाणून...

World Cup 1996: भारताचा विजय अन् पाकिस्तानी चाहत्यानं स्वत:वर झाडली गोळी; जाणून घ्या रोमहर्षक सामन्याबद्दल

Subscribe

भारतानं 1996 मध्ये पाकिस्तानला कशी धूळ चारली होती आणि सामना आपल्या खिशात घातला होता. परंतु याच वेळी एक मोठी बातमी समोर आली होती. भारताचा विजय झाल्यानं एका पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीने स्वत: ला गोळी झाडली होती. याविषयी देखील जाणून घेऊया.

क्रिकेटमधील सगळ्यात हायहोल्टेज समजला जाणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानं 1996 मध्ये पाकिस्तानला कशी धूळ चारली होती आणि सामना आपल्या खिशात घातला होता. परंतु याच वेळी एक मोठी बातमी समोर आली होती. भारताचा विजय झाल्यानं एका पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीने स्वत: ला गोळी झाडली होती. याविषयी देखील जाणून घेऊया. (ICC 2023 WC World Cup 1996 India win and Pakistani fan shoots himself Know about the thrilling match)

1996 च्या विश्वचषकात जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वचषक खेळला जात होता. दोन्ही संघ क्वाटर फायनलमध्ये पोहोचले होते आणि बंगळुरूमध्ये खेळला गेलेला हा सामना खूपच रोमांचक होता. 19 वर्षांपूर्वी झालेल्या या रोमांचक सामन्याच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊया, चला जाणून घेऊया या शानदार सामन्याबद्दल.

- Advertisement -

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावत 287 धावा केल्या होत्या. या सामन्यात सचिनने 31 धावांचे योगदान दिले.

भारताकडून नवजोद सिंग सिद्धूने सर्वाधिक धावा केल्या. सिद्धूने 11 चौकारांच्या मदतीने 93 धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. त्याला मुस्ताक अहमदने क्लीन बोल्ड केले.

- Advertisement -

या ऐतिहासिक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघासाठी सर्वाधिक 3 बळी घेतले. प्रसादने घेतलेल्या 3 विकेट्स मोठ्या होत्या. त्याच्या यशानंतर त्याला पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळणारा भारतीय खेळाडू म्हणून ओळख मिळाली.

टीम इंडियाकडून अनिल कुंबळेने 3 बळी घेतले. पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार आमिर सोहेललाही कुंबळेने बाद केले. भारताच्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 248 धावांत गारद झाला. या सामन्यात वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने पाकिस्तान संघाचा डावखुरा फलंदाज सईद अनपवारला बाद करून भारताला पहिला बळी मिळवून दिला.

टीम इंडियाच्या हातून झालेल्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता आणि भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या मोठ्या सामन्यात संपूर्ण स्टेडियम भारत आणि पाकिस्तानच्या समर्थकांनी खचाखच भरले होते. चाहते सतत आपापल्या गोंगाटाने आपापल्या संघांना प्रोत्साहन देत होते. या ऐतिहासिक सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला.

भारताकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरी होती. कारण या परभवानंतर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जाफर खानने स्वत:ला बंदुकीची गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. मदीन शहरात ही घटना घडल्याचं वृत्त त्यावेळी उर्दू दैनिक जंग ने दिलं होतं.

(हेही वाचा: ICC WC 2023: भारताची विजयी घौडदौड सुरूच; अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -