आगामी कसोटी मालिकेत मायदेशात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा
‘विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या
No @imVkohli for 3 Tests in Australia .. The right decision going to be at the birth of his first child .. but it means Australia will win the series quite easily IMO .. #JustSaying
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 10, 2020
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कर्णधार कोहली एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील सर्व सामने खेळणार आहे. मात्र, कसोटी मालिकेतील अखेरच्या तीन सामन्यांत तो खेळू शकणार नाही. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा या दाम्पत्याला जानेवारी २०२१ मध्ये अपत्यप्राप्ती होणार आहे. कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्यामुळे त्याची उणीव ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला नक्कीच भासेल.