घरक्रीडाIND vs BAN : शाकीब अल हसनने सावरले; बांग्लादेशचे भारतासमोर 266 धावांचे...

IND vs BAN : शाकीब अल हसनने सावरले; बांग्लादेशचे भारतासमोर 266 धावांचे आव्हान

Subscribe

IND vs BAN : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर फोरचा शेवटच्या सामन्यात आज (15 सप्टेंबर) भारत (India) आणि बांग्लादेश संघ (Bangladesh) आमनेसामने आहेत. कोलंबोतील (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर (R Premadasa Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार शाकीब अल हसनच्या 80 धावांच्या खेळीमुळे बांग्लादेश संघाने भारतासमोर निर्धारीत 50 षटकात 266 धावांचे आव्हान दिले आहे. (IND vs BAN Shakib Hasan saves Bangladeshs challenge of 266 runs against India)

- Advertisement -

सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेश संघाची सुरूवात खराब झाली. अवघ्या 28 धावांवर बांग्लादेशने 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने 85 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 80 धावांची दमदार खेळी करत संघाला सावरले. शाकीबसह तौहीद हृदयने 54 धावांची तर, नसुम अहमदने 44 धावांची खेळी केली. त्यामुळे बांग्लादेश संघाने निर्धारीत 50 षटकात 265 इतकी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. दरम्यान, भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर, मोहम्मद शमीला दोन विकेट मिळाल्या. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

- Advertisement -

जडेजाने २०० बळी पूर्ण केले

बांग्लादेशला 35व्या षटकात 161 धावांवर सहावा धक्का बसला. रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला एलबीडब्ल्यू बाद करत आपल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा आकडा पूर्ण केला. हा टप्पा गाठणारा तो सातवा भारतीय गोलंदाज बनला आहे. याआधी अनिल कुंबळे (337), जवागल श्रीनाथ (315), अजित आगरकर (288), झहीर खान (282), हरभजन सिंग (269) आणि कपिल देव (253) यांनी ही कामगिरी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -