घरक्रीडाIND vs ENG Test : बेन डकेटचे शतक, इंग्लंड दुसऱ्या दिवसअखेर 2...

IND vs ENG Test : बेन डकेटचे शतक, इंग्लंड दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 207 धावा

Subscribe

राजकोट : राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीमुळे भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 2 बाद 207 धावा केल्या आहेत. भारत अजूनही 238 धावांनी पुढे आहे, मात्र बेन डकेट 133 धावांवर नाबाद असून जो रूट नऊ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना लवकरात लवकर रोखण्याचे भारतीय गोलंदाजांकडे आव्हान असणार आहे. (IND vs ENG Test Ben Duckett century England 207 after 2 on the second day)

हेही वाचा – Ravichandran Ashwin : कसोटीत 500 विकेट घेत अश्विनने रचला इतिहास; कुंबळे-वॉर्नला टाकले मागे

- Advertisement -

भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला 326 धावांनी सुरुवात केली. मात्र कुलदीप यादव 4 धावांवर बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा 112 धावांवर बाद झाली. यानंतर फलंदाजीला आलेल्या ध्रुव जुरेलने 46 धावांची खेळी केली. मात्र त्याला पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावता आले नाही. त्याचवेळी भारताकडून रविचंद्रन अश्विनने सहा चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. याशिवाय जसप्रीत बुमराहने 26 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्यात आला. इंग्लंडविरुद्धची त्याची कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम पाचवी खेळी होती. दरम्यान, मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, तर रेहान अहमदला दोन आणि जेम्स अँडरसन, टॉम हार्टले व जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

- Advertisement -

भारताकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेटने चमकदार कामगिरी केली. त्याने 21 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 133 धावा केल्या. त्याचवेळी डावाला सुरुवात करणारा जॅक क्रॉली 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ओली पोपही पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 2 बाद 238 धावा केल्या आहे. बेन डकेट शतकी खेळी आणि जो रूट 9 नऊ धावा करून नाबाद आहेत.

हेही वाचा – Mitkari on Awhad : चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी…; मिटकरींचं आव्हाडांना प्रत्युत्तर

वेगवान 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा गोलंदाज

दरम्यान, अश्विनने आज जॅक क्रॉलीला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 500 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने 98 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. कसोटीत सर्वात जलद 500 विकेट्स घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 87 व्या कसोटीत ही कामगिरी केली आहे. तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने 105 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या 108व्या कसोटीत हा विक्रम केला होता. त्यामुळे आता सर्वात वेगवान 500 विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विनने शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -