घरICC WC 2023IND Vs NZ सामन्याची क्रेझ, ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली लाइव्ह...

IND Vs NZ सामन्याची क्रेझ, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘इतक्या’ कोटी लोकांनी पाहिली लाइव्ह मॅच

Subscribe

भारत वि. न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित असतानाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा कोटींच्या संख्येने हा सामना लाइव्ह पाहण्यात आला आहे. ज्यामुळे आजवरचे प्रेक्षकसंख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत निघाले आहेत.

ICC Cricket World Cup 2023 : सर्व क्रिकेट प्रेमींना उत्सुकता असलेला भारत वि. न्यूझीलंड या संघामधील सामना काल रविवारी (ता. 22 ऑक्टोबर) हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील मैदानावर खेळवला गेला. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ गुणतालिकेवर बरोबरीत असल्याने कालच्या सामन्यात दोन्ही संघामध्ये टेबल टॉपर होण्यासाठीची लढाई झाली आणि भारतीयांच्या अपेक्षांना खरे ठरवत भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक हे धर्मशाला येथील स्टेडियमवर उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुद्धा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली होती. स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित असतानाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा कोटींच्या संख्येने हा सामना लाइव्ह पाहण्यात आला आहे. ज्यामुळे आजवरचे प्रेक्षकसंख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. (IND Vs NZ match craze, live match watched by ‘so many’ crores on Disney plus Hotstar )

हेही वाचा – विश्चषकात 20 वर्षांनंतर भारताने न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकला

- Advertisement -

काल झालेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना तब्बल 3.5 कोटी लोकांनी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिला आहे. तर ज्यावेळी शेवटी भारत हा सामना जिंकणार होती. त्यावेळी मैदानावर विराट कोहली आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत असताना हा आकडा विक्रमी संख्येवर म्हणजेच 4.3 कोटीवर गेला होता. त्यामुळे आतापर्यंत कधीच इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना लाइव्ह कधीच पाहिला नव्हता, जो काल पाहिला गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात बहुचर्चित असा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 14 ऑक्टोबरला खेळला गेला. त्यावेळी देखील 3.5 कोटी लोकांनी हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार लाइव्ह पाहिला होता. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याने त्या सामन्याचा विक्रम सुद्धा मोडीत काढला आहे.

काल भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सनी पराभव केला. नेहमीप्रमाणे चेस मास्टर म्हणून ओळख असलेल्या विराट कोहली याने भारताची कोलमडलेली बाजू सावरत भारताला विजय मिळवून दिला. परंतु, या सामन्यातील विजयाचा खरा हिरो ठरला तो गोलंजदाज मोहम्मद शमी. शमीने 10 ओव्हरमध्ये केवळ 54 धावा देत न्यूझीलंड संघातील 5 खेळाडूंना तंबूत पाठवले. गेले 4 सामने शमीला मैदानाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. परंतु न्यूझीलंड विरोधातील सामन्यात शार्दूल ठाकूर याला मैदानाबाहेर ठेवत त्याच्या ऐवजी शमीला संधी देण्यात आली आणि शमीने सुद्धा त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. तर सामन्यात भारताची बाजू सावरणाऱ्या विराट कोहलीला देखील त्याचे 49 वे शतक पूर्ण करण्यासाठी 5 धावांची गरज असताना बाद व्हावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -