घरICC WC 2023विश्चषकात 20 वर्षांनंतर भारताने न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकला

विश्चषकात 20 वर्षांनंतर भारताने न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकला

Subscribe

2003 नंतर विश्वचषक स्पर्धेत भारताकडून न हरलेल्या न्यूझीलंड संघाला आज भारतीय संघाने अखेर नमवले.

धर्मशाळा : 2003 नंतर विश्वचषक स्पर्धेत भारताकडून न हरलेल्या न्यूझीलंड संघाला आज भारतीय संघाने अखेर नमवले. या कामगिरीमुळे विश्वचषचक स्पर्धेतील भारतीय संघाची 20 वर्षांची प्रतीक्षा संपली असून, आता भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांवर जाऊन पोहचला आहे.(Breaking After 20 years India won the match against New Zealand in the World Cup)

विश्वचषक स्पर्धा 2023 च्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे 10 गुण झाले आहेत. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 273 धावा केल्या. भारताने सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.

- Advertisement -

धर्मशाळा येथील मैदानावर आज भारतविरुद्ध न्यूझीलंड असा अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्व 10 गडी गमावून 273 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 130 धावा केल्या. रचिन रवींद्रने 75 आणि ग्लेन फिलिप्सने 23 धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (17 धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

विराट कोहलची शकत हुकले

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने 46 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावा केल्या. श्रेयसने 33, राहुलने 27 आणि गिलने 26 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन बळी घेतले. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा : खासगी कंत्राटी पद्धत रद्द करण्याची हिम्मत दाखवा; फडणवीसांना रघुनाथ कुचिक यांचे आव्हान

किवींना नमवले आता ‘साहेबांची’ बारी

विश्वचषक स्पर्धेत भारताने तब्बल वीस वर्षांपासून अपराजीत असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला नमवले. भारतीय संघाने ही कामगिरी वखाण्याजोगी केली असून, आता भारताचा पुढील सामना हा 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे. तेव्हा गतविजेत्या इंग्लंडला नमवणे गरजेचे असणार आहे.

हेही वाचा : PHOTOS : IND vs NZ: मोहम्मद शमीची दमदार एंट्री; भारताकडून धावांचा पाठलाग सुरू

धुक्यामुळे थांबवला होता सामना

सामना सुरू असताना धर्मशाळेच्या मैदानात बरेच धुके आले. त्यामुळे चेंडू दिसण्यात अडचण येत होती. या कारणास्तव हा खेळ थांबवण्यात आला होता. दरम्यान धर्मशाळेतील धुके कमी झाल्यानंतर आकाश निरभ्र झाले. त्यामुळे पुन्हा खेळ सुरू झाला. यावेळी 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या 117/2 अशी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -