घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बारामतीत युवकांचा अजित पवारांना घेराव; दादांनी सांगितली भूमिका

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बारामतीत युवकांचा अजित पवारांना घेराव; दादांनी सांगितली भूमिका

Subscribe

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने बारामती तालुक्यातील पणदरे गावात अजितदादांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभा संपल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांनी अजित पवारांना घेराव घालत मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारले. (Maharashtra Politics Youths surround Ajit Pawar in Baramati over the issue of Maratha reservation Dada told the role)

यावेळी अजित पवार यांनी आपली भूमिका समजावून सांगितली. दादा म्हणाले की, कोणत्याही सजमाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिक आहे. वेगवेगळ्या घटकांबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. यामध्ये माहिती घेतली असता मराठा समाजातील 10 पैकी 8 टक्के लोक गे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गताील आरक्षणाचा लाभ घेत असल्याची माहिती अजित पवरा यांनी दिली.

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार

अजित पवारांनी मराठा समाजाच्या युवकांना आपली भूमिका सांगितली. ते म्हणाले की, कोणत्याही समाजाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिक आहे. वेगवेगळ्या घटकांबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. यामध्ये माहिती घेतली असता मराठा समाजातील 10 टक्क्यातील 8 टक्के लोक हे ईडब्लुएसचा लाभ घेतात, असं पवार म्हणाले. तसंच कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

अशोक चव्हाणांची सरकारवर टीका

मराठा समाजासाठी 10 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास घटकाचे आरक्षण मान्य नसल्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं. मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारच्या जाहीरातीवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Telangana Election 2023: : भाजपची पहिली यादी जाहीर; तीन खासदार निवडणुकीच्या रिंगणात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -