Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs PAK : भारतीय फलंदाजांनी पाक गोलंदाजांची पिसे काढली; विराट-राहुलची दमदार...

IND vs PAK : भारतीय फलंदाजांनी पाक गोलंदाजांची पिसे काढली; विराट-राहुलची दमदार शतके

Subscribe

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात रविवारी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. मात्र आज 24.1 षटकांनंतर सुरू झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तान गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत दमदार शतकं केली आहेत. (IND vs PAK Indian batsmen plucked the feathers of Pak bowlers Powerful centuries by Virat Rahul)

कोलंबो येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आज राखीव दिवशीही सुरूवातीला पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सामन्याला सुरूवात झाली. विराट कोहली 8* आणि आणि केएल राहुल 17* यांनी वैयक्तिक धावांवर खेळायला सुरूवात करताना संयमी खेळी आणि त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

विराट कोहलीने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण करत एकदिवसीय सामन्यातील 47 वे शतक पूर्ण केले. याशिवाय त्याला चांगली साथ देताना केएल राहुलने 100 चेंडूंत 100 धावांची खेळी केली आहे. विशेष म्हणजे या दोघांनी 194 चेंडूंत 233 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकात 2 विकेट गमावत 356 धावांचा डोंगर उभा केला आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानने 1-1 विकेट घेतली.

- Advertisement -

आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोन सामन्यात विराट कोहलीने 94 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 122 धावांची खेळी केली तर, केएल राहुलने 106 चेंडूंत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली आहे. याशिवाय शुभमन गिलने 58 तर, कर्णधार रोहित शर्माने 56 धावांची खेळी केली.

हेही वाचा – जोकोविचने कोरले 24 ग्रॅंडस्लॅमवर नाव; ओपन एरामध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकवणारा खेळाडू

भारताने सोमवारी 24.1 षटकांत 2 विकेट गमावत 147 केल्या होत्या. या कालच्या धावसंख्येवरून आज खेळायला सुरूवात केल्यानंतर भारतीय संघाने राखीव दिवशी एकही विकटे न गमावता 356 धावा केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला 357 धावांचे आव्हान मिळाले असून ते या धावांची यशस्वी पाठलाग करणार का? हे पाहावं लागेल.

- Advertisment -