घरमहाराष्ट्र"महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर...", मराठा महासंघाचा राज्य सरकारला इशारा

“महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…”, मराठा महासंघाचा राज्य सरकारला इशारा

Subscribe

नागपूर : महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल. तर राज्य सरकारने कोणत्याही पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 दिवस असून त्यांनी पाणी सोडले आणि डॉक्टरांचा उपाचार घेण्यास नकार दिला. यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणि मराठा आरक्षणासंदर्भात दिलीप जगताप म्हणाले, “राज्य सरकारने मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवावी. पण हे राज्य सरकारच्या हाता नसल्याचे आम्हाला माहिती आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत जावे. या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना जावून सांगावे की, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नाही. यामुळे तातडीने आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे.” दिलीप जगताप पुढे म्हणाले, “ओबीसी समाजाने काही उपोषणला बसले आहेत. यांचा बोलविता धनी कोण आहे. हा दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा राजकीय प्रयत्न आहे”, असा आरोपही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षण : फडणवीसांच्या समर्थनार्थ संत साहित्य अभ्यासक मोरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले-

ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको

“आरक्षणविरोधी सूत्र हे नागपुरातून हलवली जात असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. ओसीबींचे आंदोलन हे राजकीय स्टंट आहे. आम्ही ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागितले नाही. मराठा समजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही करतोय. मग ओबीसी रस्त्यावर उतरणार असाल. तर दुसऱ्यासाठी काम करत असल्याचे पडसाद. यामुळे सामाजिक संतुलन बिघडले आणि यांची जबाबदारी ही ओबीसी संघटनांवर असेल”, असेही दिलीप जगताप यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मराठा आरक्षण हाच माझा उपचार’ ; जरांगे पाटलांचं राजकीय पक्षांना आवाहन म्हणाले…

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्यावे

मराठ्यांना 50 टक्केच्या आत आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षीय बैठकीत तोडगा काढावा. राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची समजावे. मराठा समाजाला 16 टक्के नव्हे, तर 10 टक्के तरी आरक्षण द्यावे. नाही तर जीव जाईल. आरक्षणाचा अंतिम टप्प्याचा लढा असून याला यशस्वी व्हायला पाहिजे, असे दिलीप जगताप यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -