घरक्रीडाInd vs Pak : भारताविरुद्ध हरलो तरी चालेल, पण...; पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूने...

Ind vs Pak : भारताविरुद्ध हरलो तरी चालेल, पण…; पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूने बाबरला दिला खास सल्ला

Subscribe

Ind vs Pak asia cup 2023 : आशिया चषकाला पाकिस्तान (Pakistan) आणि नेपाळ (Nepal) सामन्याने सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर पाकिस्तानचा दुसरा सामना आता भारतीय संघासोबत होणार आहे. उद्या (2 सप्टेंबर) होणाऱ्या सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहणार आहे. पण त्याआधीच पाकिस्तानच्या माजी अष्टपैलू अब्दुल रझाक (Abdul Razak) याने भारताविरुद्ध (India) हरलो तरी चालेल, पण संघात बदल करण्याचा सल्ला कर्णधार बाबर आझमला दिला आहे. (Ind vs Pak Losing against India will do but The former Pakistan all rounder gave special advice to Babar)

हेही वाचा – BCCI च्या मीडिया राईट्स मुकेश अंबानींकडे; Viacom18 वर पाहता येणार सामने

- Advertisement -

पाकिस्तानचा 43 वर्षीय माजी अष्टपैलू अब्दुल रझाक एका वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाला की, सध्याचा पाकिस्तान संघ ‘सर्वोत्तम’ आहे. पाकिस्तानकडे मधल्या फळीत चांगले फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. याशिवाय वेगवान आणि फिरकी गोलंदाज पूर्ण ताकदीने मारा करत आहेत. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतील गटवार सामन्यात पाकिस्तान संघाला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला तरी कर्णधार बाबर आझमने घाबरू जाऊ नये. पराभवानंतरही त्याने संघात कोणतेही बदल करण्याचा विचार करू नये, असे ते म्हणाले.

दरम्यान, नेपाळविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे लक्ष आता कट्टर प्रतिस्पर्धी भारतावर आहे. कँडी येथे अ गटातील रोमहर्षक लढतीत दोन्ही संघ आमनेसामने येतील. बाबर आझमच्या संघाचा विजय त्यांना थेट सुपर फोरमध्ये घेऊन जाईल, तर रोहित शर्माचा संघ सलामीच्या सामन्यात विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले की, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेपाळविरुद्ध आम्ही चांगल्या अंतराने जिंकलो आहोत. या विजयामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक असतात. त्यामुळे आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के द्यायचे आहेत, असे तो म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – INDIA Alliance : “आमच्यात कोणतेही मतभेद नाही, पण…,” अरविंद केजरीवालांचे स्पष्ट मत

नेपाळविरुद्ध पाकिस्तानचा 238 धावांनी मोठा विजय

मुलतान येथे पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (151) आणि इफ्तिखार अहमद (109*) या दोघांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे पाकिस्तानने निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 342 धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना नेपाळ संघाला 23.4 षटकांत अवघ्या 104 धावांवर रोखले. शादाब खानने 27 धावांत 4 बळी घेतले तर, हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -