घरमहाराष्ट्रनाशिक'बालाजी वारी'त व्यंकटरमणा गोविंदाचा गजर; हजारो भाविकांचा सहभाग

‘बालाजी वारी’त व्यंकटरमणा गोविंदाचा गजर; हजारो भाविकांचा सहभाग

Subscribe

नाशिक : गोविंदा गोविंदा चा जयघोष, डोळ्यांना लागलेली बालाजी दर्शनाची आस अन् चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा भक्तिभाव अशा चैतन्यमय वातावरणात सुमारे अडीच हजारावर भाविकांनी शुक्रवार दि.१ रोजी बालाजीची वारी केली. बालाजी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या तेरा वर्षांपासून ‘वारी बालाजीची’ हा उपक्रम राबवला जात आहे. दर वर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जेहान सर्कल ते सोमेश्वर येथील बालाजी मंदिरापर्यंत ही पायीवारी काढली जाते.

श्रावणातील तिसर्‍या शुक्रवारी वारीला सुमारे अडिच हजारावर भाविक महिला व पुरुष उपस्थित होते. मार्गावर कुठेही अस्वच्छता हेाणार नाही, पिण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या रस्त्यावर फेकू नये, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. या स्वयंसेवकांकडून वारी मार्गातील कचरा संकलीत करण्यात आला. गोविंदा गोविंदा’चा गजर, शंखनाद,बासरी वादन करीत वारीत सहभागी झालेले भाविक बालाजी मंदिर येथे पोहोचल्यावर मंदिरात झालेल्या भक्ती गीत, भजन कार्यक्रम तसेच नामस्मरणात तल्लीन झाले.

- Advertisement -

यावेळी महिलांनी फुगडी,गरबाचा आनंद लुटला. महाअभिषेकावेळी नाशिकसह संपुर्ण देशात पाऊस पडावा आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे,बळीराजाला आणि सर्वसामान्य नागरिकांना सुख-समृद्दीचे दिवस यावेत यासाठी व्यकटेश बालाजीला साकडे घालण्यात आले. महापूजेच्या मानकर्‍यांकडून मंदिरात अभिषेक व महाआरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. वारी संपल्यानंतर भाविकांना जेहान सर्कल पर्यंत सोडण्यासाठी चार बसची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी योगेश बागड, महेश पितृभक्त, विनोद कोठावदे, विनोद सोनजे, मनीष जगनानी, हर्षद चिंचोरे, चेतन सोनजे, हरीश कुंभारे, मधुकर भोकरे, हेमंत ढबळे, योगेश बधान, चंद्रकांत बोरसे आदी प्रयत्नशील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -