घरICC WC 2023IND Vs PAK: शुभमन गिलचं कमबॅक; नाणेफक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

IND Vs PAK: शुभमन गिलचं कमबॅक; नाणेफक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

Subscribe

या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ फलंदाजी अन् गोलंदाजीमध्ये समतोल आहे. फिरकी गोलंदाज फॉर्मात आहेत. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज फॉर्मात नाहीत, याचाच फायदा भारत घेऊ शकतो.

अहमदाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ फलंदाजी अन् गोलंदाजीमध्ये समतोल आहे. फिरकी गोलंदाज फॉर्मात आहेत. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज फॉर्मात नाहीत, याचाच फायदा भारत घेऊ शकतो. (IND Vs PAK Shubman Gill s comeback India s bowling decision winning the toss Rohit Sharma )

अहमदाबादमध्ये खेळपट्टी कशी आहे

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य मानली जाते. या मैदानावर फलंदाज खूप धावा करतात. येथे चेंडू बॅटला चांगला आदळतो, ज्याचा फलंदाज पुरेपूर फायदा घेतात. आणि वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळते. याशिवाय, जसजसा सामना पुढे सरकतो तसतसे फिरकीपटूनांही याचा फायदा होतो. बांउड्री लाईन मोठी असल्यानं इथे गोलंदाज मुक्तपणे गोलंदाजी करू शकतात.

- Advertisement -

आतापर्यंत या मैदानावर एकूण 29 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा सामना जिंकला आहे आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 13 वेळा सामना जिंकला आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल त्याला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि बोर्डावर मोठी धावसंख्या ठेवायची आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील एकदिवसीय सामन्यातील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 आणि दुसऱ्या डावाची 206 आहे.

सामन्यासाठी दोन्ही संघ-

- Advertisement -

भारत– रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शर्मी. मोहम्मद सिराज.

(हेही वाचा: IND Vs PAK: शुभमन गिल की इशान किशन? कोणाला मिळणार संधी, ‘अशी’ असेल संभाव्य Playing 11 )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -