घरमहाराष्ट्रओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली, परंतु मला...; धमकी देणाऱ्यांना भुजबळांकडून जोरदार प्रत्युत्तर

ओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली, परंतु मला…; धमकी देणाऱ्यांना भुजबळांकडून जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने मराठा-ओबीसी दस्तावेज शोधण्यासाठी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. मात्र मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्राची  मागणी केल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी या मागणीला विरोध केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध भुजबळ असा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही अनेक वेळा भुजबळांवर निशाणा साधला आहे. हे सर्व सुरू असतानाच छगन भुजबळ यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र आता छगन भुजबळ यांनी धमकी देणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (I left Shiv Sena on OBC issue Strong response from Chhagan Bhujbal to the threats Manoj Jarange Patil)

छगन भुजबळ म्हणाले की, मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाहीतर अनेकवेळा येत आहेत. जीवंत राहणार नाही, तुझी वाट लावू आणि शिव्या देत आहेत. परंतु मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. पोलिसांकडे धमकी देणाऱ्यांची तक्रार केली आहे, पोलीस काय ते बघतील, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली.

- Advertisement -

हेही वाचा – भुजबळांसहित सदावर्तेंनाही सुनावलं; उपमुख्यमंत्र्यांनी अशी येडपटं पाळलीच कशी? जरांगेंचा सवाल

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मला मोठ केलं

शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली, परंतु मराठ्यांनी मला मोठे केले असे सांगून आज शिव्या देत आहेत. मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे, म्हणूनच मला संधी दिली असेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

- Advertisement -

मराठा समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच

मराठा आरक्षणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच. कारण मी एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही, मी ओबीसीसाठी काम करत आहे. जानकर यांनी मला समर्थन दिले, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचे काम आहे. राज्यात ओबीसी 54 टक्केपेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळे आणि टिकणारे आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांचे मी काय खाल्ले हे त्यांनी सांगावे आणि आता मनोज जरांगे पाटील कुणाचे खातोय हे देखील त्यांनी सांगावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक; कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी – वडेट्टीवार

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (13 ऑक्टोबर) फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारपासून भुजबळ यांना अज्ञात लोकांकडून धमकीचे फोन येत होते. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशा शब्दात भुजबळांना यांना धमकावण्यात आले. याप्रकरणी अजित पवार गटाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -