घरक्रीडाIndia vs Pakistan : मॅच भारत -पाकिस्तानची, चर्चा मात्र हसन अलीच्या पत्नीची

India vs Pakistan : मॅच भारत -पाकिस्तानची, चर्चा मात्र हसन अलीच्या पत्नीची

Subscribe

India vs Pakistan T20 world cup match: भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित सामना नुकताच दुबईत पार पडला. यंदा ICC T20 विश्वचषक सामन्यात मोठ्या गॅपनंतर भारतीय संघ-पाकिस्तानचा पराभव करेल अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय संघाला खराब फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे सामना गमावावा लागला. असे असले तरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत क्रिकेटची क्रेझ नेहमीच पाहायला मिळते. जेव्हा हे दोन्ही देश एकमेकांसामोरे येतात तेव्हा क्रिकेटप्रेमींचा उत्साह अधिकच डबल झालेला पाहायला मिळतो. ICC T20 विश्वचषकाच्या सामन्यातही तेच दिसून आले. आयसीसी विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. यामुळे आता सोशल मीडियावरच दोन्ही संघाच्या समर्थकांकडून चांगलाच दंगा सुरू आहे. पाकिस्तानच्या संघाचे चाहते चांगलेच खूश असून भारतीय संघाला ट्रोल करत आहे. मात्र या ट्रोलिंगमध्ये एक जोडीला देखील मोठ्याप्रमाणात ट्रोल केलं जातयं. ती जोडी म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली आणि त्याची भारतीय पत्नी सामिया हसन अली.

- Advertisement -

सामन्यातील खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेटर हसन अलीची पत्नी समिया हिला ट्रोल केलं जातयं. हसन अलीने या सामन्यात दोन विकेट जरी घेतल्या असली तरी तो अनेकांवर भारी पडला. त्याने ४४ धाव केल्या. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी हसन अलीची त्याच्या पत्नीच्या नावे चांगलीच फिरकी घेतली आहे. पत्नी भारतीय असल्याने तो हसन अली आऊट झाल्याचे मत पाकिस्तानी ट्रोलर्स व्यक्त करतायत. तर अनेकांनी समियाला ट्रोल करताना टेनिसपटू सानिया मिर्झाचा उल्लेख केला आहे. कारण सानिया मिर्झाने देखील पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिकसह लग्न केलेय.

- Advertisement -

सामियाचा जन्म हरियाणामध्ये झाला होता. ती एमिरेट्स एअरलाइन्समधील उड्डाण इंजिनियर आहे. तिचे कुटुंब सध्या नवी दिल्लीत वास्तव्यास आहे. सामिया हसन अलीला पहिल्यांदा दुबईमध्ये भेटली होती. या भेटी आधी मैत्री आणि नंतर प्रेमात बदलली. अखेर दोघांनी २० ऑगस्ट २०२१९ रोजी एका खास कार्यक्रमात लग्न केले. लग्नानंतर दोघांना एक मुलं आहे. हसन हा पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -