घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: वानखेडेंची आज सायंकाळी दिल्ली NCB दक्षता समितीपुढे हजेरी; क्रूझ...

Cruise Drugs Case: वानखेडेंची आज सायंकाळी दिल्ली NCB दक्षता समितीपुढे हजेरी; क्रूझ प्रकरणाचा तपास दिल्ली NCB च्या अधिकाऱ्यांकडे

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा पंच प्रभाकर साईलचा व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळणं आलं आहे. प्रभाकर साईलने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची डील करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. दिल्लीतील एनसीबी अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत समीर वानखेडे यांना ताबडतोब दिल्लीत बोलावण्यात आले आहे. तर याप्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीतून तीन एनसीबीचे अधिकारी उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत.

- Advertisement -

काल, रविवारी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील करण्यात आली. मात्र ही डील १८ कोटींची झाली. यातील ८ कोटी समीर वानखेडेंना आणि उर्वरित इतरांमध्ये वाटून घेण्याचे ठरल्याचा सनसनाटी आरोप याप्रकरणातील एनसीबीचा पंच आणि किरण गोसावीचा बॉडीगार्डने केला. त्यानंतर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत उच्च पातळीवर त्याची चौकशी करण्याचे ठरवले आहे. या चौकशीसाठी दक्षता टीम तयार करण्यात आली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांची दिल्लीत चौकशी होणार असून वानखेडे यांना ताबडतोब दिल्ली रवाना होण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील तपासासाठी दिल्लीतून तीन अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. याप्रकरणावर डीआयजी ज्ञानेश्वर सिंग स्वतः तपास करणार आहेत. दरम्यान आज सत्र न्यायालयात समीर वानखेडे यांनी जाऊन स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर केले आणि सर्व आरोप फेटाळून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Cruise Drug Case: माझ्या कारकिर्दीत कधीही चुकीच वागलो नाही, तरीही कुटुंबिय लक्ष्य; वानखेडेंनी कोर्टात मांडली बाजू


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -