घरक्रीडाभारतीय फलंदाजांनी कोहलीचे अनुकरण करावे!- श्रीकांत

भारतीय फलंदाजांनी कोहलीचे अनुकरण करावे!- श्रीकांत

Subscribe

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने गुरुवारी झालेल्या विंडीजविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा केला. त्याने या धावा ४१७ डावांमध्ये पूर्ण केल्यामुळे सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा (४५३ डाव) या महान फलंदाजांना मागे टाकत तो सर्वात जलद २० हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याचे भारताच्या इतर फलंदाजांनी अनुकरण केले पाहिजे, असे भारताचे माजी खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० हजार धावा पूर्ण करणे ही कोहलीची कामगिरी उल्लेखनीय आहे. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे, हा त्याचा सर्वोत्तम गुण आहे. त्याच्यामध्ये संघासाठी कोणतीही भूमिका पार चोख पार पाडण्याची क्षमता आहे, असे श्रीकांत म्हणाले.

- Advertisement -

कोहलीने या विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावली आहेत. मात्र, फक्त त्याच्यावर अवलंबून राहणे भारताला महागात पडू शकेल, असे श्रीकांत यांना वाटते. रोहितने पुन्हा फॉर्मात येण्याची गरज आहे. मागील दोन सामन्यांत त्याने फारशा धावा केल्या नाहीत. राहुलनेही अधिक जबाबदारीने खेळले पाहिजे.

तो मागील काही सामन्यांत चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारून बाद झाला आहे. त्यामुळे त्याने चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर केले पाहिजे आणि याची त्यालाही कल्पना असेल. मधल्या फळीतील विजय शंकर आणि केदार जाधव यांना फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे श्रीकांत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -