घरक्रीडा'पृथ्वी शॉ' च्या अडचणीत वाढ; दीर्घकाळासाठी क्रिकेटपासून राहावे लागणार दूर

‘पृथ्वी शॉ’ च्या अडचणीत वाढ; दीर्घकाळासाठी क्रिकेटपासून राहावे लागणार दूर

Subscribe

भारताचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आता बऱ्याच काळासाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. पृथ्वी शॉ हा नुकताच एका स्पर्धेदरम्यान जखमी झाला होता.

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप खेळत आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध 15 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. यानंतर टीम इंडिया 17 सप्टेंबरला फायनल खेळणार आहे. या सगळ्या दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आता बऱ्याच काळासाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. पृथ्वी शॉ हा नुकताच एका स्पर्धेदरम्यान जखमी झाला होता. (Indian Team Prithvi Shaw inured Will have to stay away from cricket for a long time )

अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार

गेल्या महिन्यात कौंटी क्रिकेटमध्ये डरहमविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना पृथ्वी शॉच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर पृथ्वी शॉ नॉर्थम्प्टनशायरकडून उर्वरित सामने खेळू शकला नाही. एका रिपोर्टनुसार, पृथ्वीला दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते. पृथ्वी शॉ तीन-चार महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. मात्र, त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

- Advertisement -

पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्मामध्ये होता

या स्पर्धेत पृथ्वी शॉने 13 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात 76 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या, ज्याच्या मदतीने नॉर्थम्प्टनशायरने सहा विकेट्सने विजय मिळवला. यापूर्वी त्याने याच स्पर्धेत शानदार द्विशतकही झळकावले होते.

टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नाही

पृथ्वी शॉने टीम इंडियासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत. या कसोटीत त्याने शतकाच्या जोरावर 339 धावा जोडल्या. वनडेमध्ये त्याने 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत. 2021 मध्ये तो शेवटचा टीम इंडियाच्या जर्सीत दिसला होता. त्यानंतर जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भाग घेतला होता.

- Advertisement -

(हेही वाचा: पराभवानंतर पाकिस्तान संघाचे सावध पाऊल; श्रीलंकेविरुद्धच्या लढतीसाठी संघात केले मोठे बदल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -