घरक्रीडाआंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप बुडोकन कप स्पर्धा

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप बुडोकन कप स्पर्धा

Subscribe

प्रथमेश आणि श्रेया तिलोत्तम शिरोडकर या भावंडांनी नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप बुडोकन कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विक्रोळीचे रहिवासी असणार्‍या या भावंडांनी या स्पर्धेत ३ सुवर्णपदके आणि १ कांस्यपदक पटकावले.

श्रेयाने काथामध्ये सुवर्णपदक आणि कुमीथेमध्ये कांस्यपदक मिळवले. तर, प्रथमेशने काथा आणि कुमीथे या दोन्ही प्रकारांत सुवर्ण कामगिरी केली. श्रेया ही सध्या विक्रोळी पश्चिम येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे शिकत असून प्रथमेश खारघरच्या सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे ऑटोमोबाइल इंजीनियरिंगचे शिक्षण घेत आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप बुडोकन कप स्पर्धेत १२ देशांमधून एकूण ४१० तर भारतातून ८८ स्पर्धक सहभागी झाले होते. भारताकडून श्रेया आणि प्रथमेशसोबतच निकोलस फर्नांडिस, यश कारिया, आर्यन नायर, मोनिष रॉय, आशिष शेट्टी, पुनांग छेडा यांसारख्या खेळाडूंनी भाग घेतला होता.

मुंबई आणि ठाणे येथील ८ स्पर्धकांची निवड आय.आय.के.एफ संघामधून करण्यात आली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदके पटकावली. या संघाचे प्रशिक्षक आणि आय.आय.के.एफचे व्यवस्थापक शियान फ्राझ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -