घरक्रीडासूर्यकुमार फिरकीपटूंविरुद्ध सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक!

सूर्यकुमार फिरकीपटूंविरुद्ध सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक!

Subscribe

आयपीएलच्या प्ले-ऑफमधील ’पात्रता फेरी-१’च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ६ विकेट राखून पराभव करत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत स्थान मिळवले. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर मुंबईच्या फिरकीपटूंनी चेन्नईला १३१ धावांवर रोखल्यावर मुंबईने १३२ धावांचे लक्ष्य १८व्या षटकात गाठले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाज करत ५४ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली. त्यामुळे या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमारची स्तुती केली.

सूर्यकुमार हा फिरकीपटूंविरुद्धच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. या सामन्यात चेन्नईचे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील याची आम्हाला खात्री होती. सूर्यकुमार फिरकीपटूंविरुद्ध खूप चांगली फलंदाजी करतो. मी त्याला खूप आधीपासून खेळताना पाहत आहे. तो यष्टींच्या मागे जे फटके मारतो, ते मारणे फार अवघड असते. मला खात्री होती की तो या स्पर्धेत कधीतरी आपले महत्त्व दाखवून देईल, असे रोहित म्हणाला.

- Advertisement -

तसेच रोहितने मुंबईच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. चेन्नईला कमी धावांवर रोखणे महत्त्वाचे होते, कारण त्यांच्या फिरकीपटूंविरुद्ध खेळणे सोपे नसते. आम्ही जयंतला या सामन्यात संधी दिली कारण चेन्नईच्या संघात फारसे डावखुरे फलंदाज नाहीत. तसेच धोनी अखेरच्या षटकांत काय करू शकतो याची आम्हाला कल्पना होती. मात्र, आम्ही योजना केली होती आणि आमच्या गोलंदाजांनी त्यानुसारच गोलंदाजी केली, असे रोहितने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -