घरक्रीडाIPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात 'नव्या भारता'ची छाप

IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नव्या भारता’ची छाप

Subscribe

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 पर्वाला उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली आहे. गतविजेचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात नव्या भारताची छाप पाहायला मिळाली. (IPL 2024 Opening Ceremony Imprint of New India in the opening ceremony of IPL)

हेही वाचा – IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या पर्वापूर्वीच मोठे फेरबदल, या संघात खेळाडूंची अचानक भरती

- Advertisement -

आयपीएल 2024 चा उद्घाटन सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे बॉलीवूडचे कलाकार आणि गायकांनी उपस्थिती लावली. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची सुरूवात अक्षय कुमारने हातात तिरंगा घेऊन केली. अक्षय कुमार हातात तिरंगा घेऊन मैदानावर आला. त्यानंतर टायर श्रॉफ स्टेजवर आला. या दोघांनी देशभक्तीपर गाण्यांवर आपली अदाकारी सादर केल्यानंतर बॉलीवूड गाण्यावरही दोघे थिरकले. यानंतर सोनू निगम आणि एआर रहमान यांनी माँ तुझे सलाम हे गाणे सादर करत चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. तसेच इतर गायकांनी देशभक्तीपर गाणे सादर केले. पण उद्घाटन सोहळ्यात चांद्रयान मोहीमेचे अॅनिमेशन दाखवून नव्या भारताची छाप पाडण्यात आली.

हेही वाचा – Kejriwal Arrest : मुख्यमंत्र्यांच्या अटकेबद्दल काय आहेत नियम; फक्त या दोन पदावरील व्यक्तींना संविधानाचे संरक्षण

- Advertisement -

दरम्यान, चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सीएसके विक्रमी नवव्यांदा आयपीएलचा सलामीचा सामना खेळणार आहे. तर त्याचवेळी आरसीबी पाचव्यांदा हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. घरच्या मैदानावर आरसीबीविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांची आकडेवारी नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आठ सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने सात सामने जिंकले आहेत, तर आरसीबीला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे आजच्या पहिल्याच सामन्यात चुरशीची लढत होणार असून कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -