घररायगडआचारसंहिता विसरले, सर्वच राजकीय नेते कशात रमले!

आचारसंहिता विसरले, सर्वच राजकीय नेते कशात रमले!

Subscribe

राजकीय पक्षांच्या कार्यालयाला लावण्यात आलेल्या पाटया झाकण्यात आल्या नसल्याने निवडणुक अधिकारी या राजकीय नेत्यांना पाठीशी घालत आहेत की काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कर्जत-:केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली.लोकसभेसाठी देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. ( All the political leaders of Karjat-Khalapur assembly constituency have forgotten the code of conduct) मात्र कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील सर्वच राजकीय नेत्यांना आचारसंहितेचा विसर पडल्याचे दिसत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.विविध संघटना, संस्था सार्वजनिक कार्यक्रम राबवत असताना त्यांना कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय पक्षाची कार्यालये उघडी आहेत. त्या कार्यालयावर पक्षाचे चिन्ह, नाव, नेते मंडळीचे फोटो आचारसंहिता लागू होऊन सहा दिवस उलटले तरी झळकत आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पेपरने झाकणे बंधनकारक आहे मात्र राजकीय कार्यालये नियमांना पायदळी तुडवत आहेत.

- Advertisement -

खुलेआम बैठक घेणे सुरू आहे. आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे. तरी देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.तर गाड्यांवर पक्षाचे चिन्ह आहे. ते देखील झाकले नाही.

मतदार संघातील फक्त कोनशिला पेपरने झाकल्या आहेत. बॅनर काढले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले गेले. पण राजकीय कार्यालय, गाड्यांवर खुलेआम पक्षाचे स्टिकर लाऊन फिरत आहे. त्यावर कारवाई कधी होणार? अशी चर्चा सध्या सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -