घरक्रीडाविश्वचषकाच्या तयारीसाठी आयपीएल फायद्याचे!

विश्वचषकाच्या तयारीसाठी आयपीएल फायद्याचे!

Subscribe

रोहित शर्माचे मत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेची रविवारी सांगता झाली असून, आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकाकडे लागले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना केवळ १८ दिवसांची विश्रांती मिळणार असल्याने खेळाडूंचा फिटनेस खालावेल असे काही लोकांचे मत होते. मात्र, आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या मताशी सहमत नाही. त्याच्या मते विश्वचषकाच्या तयारीसाठी खेळाडूंना आयपीएलचा फायदाच झाला आहे.

सामने खेळायचे की नाही ही वैयक्तिक बाब असून, खेळाडू त्यांचा निर्णय घेऊ शकतात. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्ही सर्व खेळाडूंबाबत चर्चा केली. प्रत्येक खेळाडूची गोष्ट वेगळी असते. बुमराहला सामने खेळायचे असतात, कारण सामने खेळल्यास आपण जास्त फिट राहू असे त्याला वाटते. आमचे फिजियो त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून होते. कोणताही खेळाडू किती फिट आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. मागील वर्षी आम्ही आयपीएल खेळलो आणि त्यानंतर थेट चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला गेलो. माझ्या मते कोणत्याही मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा मिळतो. जे खेळाडू फॉर्मात नाहीत, त्यांना पुन्हा फॉर्मात येण्यासाठी या स्पर्धेची मदत होते, असे रोहित म्हणाला.

- Advertisement -

अष्टपैलू हार्दिक पांड्याने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे अंतिम सामन्याआधी मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला, तीन वर्षांपूर्वी हार्दिकला आपल्यात किती प्रतिभा आहे, याची कल्पना नव्हती. मात्र, त्यानंतर तो भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला आहे. जेव्हा खेळाडू २४-२५ वर्षांचे असतात, तेव्हा त्यांना खूप गोष्टी शिकायच्या असतात. हा मोसम हार्दिकसाठी खूप चांगला राहिला आहे. त्याला आम्ही वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली आणि त्याने या संधीचा चांगला वापर केला. तो अजूनही गोष्टी शिकत राहील, अशी मला आशा आहे. त्याच्यासारखा खेळाडू संघात असल्याचा खूप फायदा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -