घरक्रीडाकेव्हिन ओ ब्रायनने मारला षटकार; स्वत:च्याच गाडीची फोडली काच

केव्हिन ओ ब्रायनने मारला षटकार; स्वत:च्याच गाडीची फोडली काच

Subscribe

आयर्लंडचा स्टार क्रिकेटपटू केव्हिन ओ ब्रायन याने षटकार मारत स्वत:च्याच गाडीची काच फोडली आहे.

बऱ्याचदा क्रिकेटपटूनकडून मैदानावर अनेक मजेदार किस्से घडत असतात. तर काही खेळाडूंची फलंदाजी इतकी आक्रमक असते की त्यांनी मारलेला चेंडू मैदानाबाहेर जातो. तर काही वेळा घराच्या काचा तर काहीवेळा गाडीच्या काचा फोडतात. पण, एका क्रिकेटपटून षटकार मारत स्वत:च्याच गाडीचे नुकसान करुन घेतले आहे.

आयर्लंडचा स्टार क्रिकेटपटू केव्हिन ओ ब्रायन याने गुरुवारी षटकार मारत स्वत:च्या गाडीची काच फोडली आहे. पेम्ब्रोक येथे टी-२० इंटर प्रोव्हेंशिल सीरिजमध्ये केव्हिन ओ ब्रायनने लेन्स्टर लायटनिंग संघाकडूनन खेळताना ३७ चेंडूत ८२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे लायटनिंगने नॉर्थ वेस्ट वॉरियर्सविरुद्ध १२ षटकात ४ बाद १२४ धावा केल्या.

- Advertisement -

दरम्यान, या सामन्यात केव्हिन ओ ब्रायनने षटकार मारला आणि चेंडू थेट मैदानाबाहेर उभारलेल्या गाडीवर जाऊन पडला. चेंडू इतक्या वेगात होता की त्यात गाडीची अक्षरश: काच फुटली. केव्हिन क्रिकेट आयर्लंडने गाडीचा फोटो शेअर केला आहे. केव्हिन ओ ब्रायनने ३ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २२१ पेक्षा जास्त होता. त्यानंतर नॉर्थ वेस्ट वॉरियर्सला १२ षटकात ८ बाद १०४ धावा करता आल्या. लायटनिंगने हा सामना डकवर्थ लुइस नियमानुसार २४ धावांनी जिंकला.


हेही वाचा – मानसिक तणावातून सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने केली आई व पत्नीची हत्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -