घरटेक-वेकलाँच होण्यापूर्वीच Realme 7 Pro स्मार्टफोनचे फीचर्स झाले लीक

लाँच होण्यापूर्वीच Realme 7 Pro स्मार्टफोनचे फीचर्स झाले लीक

Subscribe

भारतात ३ सप्टेंबर रोजी Realme 7 Pro आणि Realme 7 होणार लाँच

भारतात Realme आपली 7 वी सीरीज 3 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. सीरीजमधले दोन स्मार्टफोन Realme 7 आणि Realme 7 Pro येणार आहे. लाँच होण्यापूर्वीच Realme 7 Pro स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. एका प्रसिद्ध टिप्स्टरने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 4,500mAh बॅटरी अशी फीचर्स मिळू शकतात. तसेच, 65W फास्ट चार्जिंगचा देखील या फोनला सपोर्ट देण्यात येणार आहे.

टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या मते, Realme 7 Pro स्मार्टफोनला 6.4 इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले मिळणार आहे, जो 1080×2400 पिक्सल रिझोल्यूशन असणार आहे. सेल्फी कॅमेर्‍याच्या डिस्प्लेत पंच-होल देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरवर कार्यरत असणारा हा स्मार्टफोन 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि 8GB रॅमसह 128GB स्टोरेज दोन वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

असा असणार कॅमेरा

या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून जो Sony IMX682 सेन्सरचा आहे. याशिवाय 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात येणार आहे. सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्यासह जो 85 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूची लेन्स देण्यात आली आहे.

- Advertisement -

टीझरमध्येच कंपनीने खुलासा केला आहे की फोनची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह असणार आहे. फोनमध्ये वापरण्यात आलेले हे भारतातील सर्वात वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देखील आहेत.


भारतात ३ सप्टेंबरला लाँच होणार Realme 7 आणि 7 Pro

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -