घरक्रीडाKhel Ratna Award 2021: मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळाल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया,...

Khel Ratna Award 2021: मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळाल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Subscribe

नीरज चोप्नाने पुरस्कार दिल्यानंतर मी आनंदित आहे आणि भविष्यात देखील चांगली कामगिरी करणार असल्याची आशा व्यक्त केली आहे

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्याला हा पुरस्कार स्विकारल्यानंकर मी आनंदित आहे आणि भविष्यात देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची आशा त्याने व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. ऑलिम्पिकमध्ये केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर अजून १२ खेळाडूंना १३ नोव्हेंबरला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नीरज चोप्राने आपला आनंद व्यक्त करताना सर्व भारतीयांचे आभार मानले आहेत. तर भविष्यात देखील सुवर्ण कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन अशी आशा व्यक्त केली.

नीरजने म्हटले की….

नीरजने ट्विटरच्या माध्यमातून लिहले की, “कित्येक महान खेळाडूंसोबत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळत आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी मी मनापासून तुमचा आभारी आहे. माझा प्रयत्न हाच असेल की माझ्या प्रदर्शनातून देशासाठी आणखी काही तरी कमवेन. भविष्यात देखील चागंली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन”

- Advertisement -

या खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

- Advertisement -

नीरज चोप्रा –          अॅथेलेटिक्स
रवी दहिया –           कुस्ती
पीआर राजेश –         हॉकी
लवलीना बोर्गाहेन –     मुक्केबाजी
सुनील छेत्री      –       फुटबॉल
मिताली राज    –        क्रिकेट
प्रमोद भगत     –        बॅटमिंटन
सुमित अंतिल   –        अॅथेलेटिक्स
अवनी लेखारा   –        नेमबाजी
कृष्णा नगर      –       बॅटमिंटन
मनीष नरवाल    –      नेमबाज
मनप्रीत सिंग     –      हॉकी

 


हे ही वाचा: T20 world cup 2021: NZ VS SCO न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय; स्कॉटलँडचे आव्हान संपुष्टात


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -