घरक्राइमDiwali 2021 : बंदी घातलेल्या बेरीयम सॉल्ट रसायन मिश्रीत फटाक्यांचा साठा जप्त

Diwali 2021 : बंदी घातलेल्या बेरीयम सॉल्ट रसायन मिश्रीत फटाक्यांचा साठा जप्त

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बेरियम सॉल्टचा वापर केलेल्या फटाक्यांचा मोठा साठा पोलिसांनी खोपोलीत जप्त केला. दिवाळी सणामध्ये पर्यावरणास घातक असणार्‍या विविध रसायन मिश्रीत फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे पर्यावरणाचे अपरिमीत नुकसान होत असते. यामुळे बेरीअम सॉल्ट नावाचे घातक रसायन मिश्रीत असणा-या सर्व फटाक्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. बंदी असतानाही खोपोलीत असे फटाके सर्रास विकले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खोपोलीत शोध मोहिम सुरू केली होती. या मोहिमेत दवन्हावे येथील एस.पी.एन्टरप्राईझेस या दुकानात फटाक्यांचा साठा करण्यात आल्याचे कळले. पोलिसांनी छापा मारत या दुकानातील १८ लाख ४४ हजार रुपये किमतीचे बेरियम सॉल्टचे फटाके जप्त केले. पोलिसांनी संबंधित मालकाविरोधी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीष आस्वर हे करीत आहेत.


हे ही वाचा – भाऊबीजेची ओवाळणी म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत द्या, रुपाली चाकणकरांचे मोदींना पत्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -