घरक्रीडागोलंदाजांना मदत व्हावी म्हणून आव्हानात्मक खेळपट्ट्या बनवा!

गोलंदाजांना मदत व्हावी म्हणून आव्हानात्मक खेळपट्ट्या बनवा!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रिकेटच्या नियमांत काही बदल केले आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता गोलंदाजांना चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर करता येणार नाही. यामुळे गोलंदाज ‘रोबोट्स’ बनण्याची भीती पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने व्यक्त केली होती. क्रिकेट हा आता फलंदाजांचा खेळ बनत चालला आहे अशी वारंवार टीका होत असते. त्यातच आता थुंकीच्या वापरावर बंदी घातल्याने गोलंदाजांचे काम अधिकच अवघड होणार आहे असे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंना वाटत आहे. परंतु, या बदलाबाबत काहीही बोलण्याआधी आपण काही काळ थांबले पाहिजे, असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला वाटते.

जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका नियमांतील बदलांबाबत आपल्याला खूप काही सांगेल. इंग्लंडमध्ये घामाचा वापर करुन चेंडू चमकवू शकतो आणि गोलंदाजांना थुंकीची गरज भासणार नाही असे अनेक लोक म्हणत आहेत. चेंडूला तकाकी आणण्यासाठी कृत्रिम पदार्थाच्या वापरला परवानगी दिली जाईल असे मला वाटत नाही.

- Advertisement -

चेंडूला तकाकी आणण्यासाठी घाम थुंकीइतकाच उपयुक्त ठरत असेल तर आणखी पर्यायांचा विचारही करावा लागणार नाही. तसेच गोलंदाजांना मदत व्हावी यासाठी आव्हानात्मक खेळपट्ट्या बनवल्या पाहिजेत. खेळपट्टीवर जास्त गवत ठेवता येईल. त्याचप्रमाणे अधिक वेग आणि उसळी घेणार्‍या खेळपट्ट्या बनवता येतील. त्यामुळे बॅट आणि चेंडूत समतोल राहील, असे द्रविडने सांगितले. तसेच प्रेक्षकांविना सामने खेळणे खेळाडूंसाठी थोडे विचित्र असणार आहे, असेही द्रविडला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -