घरक्रीडाधोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची पुन्हा हाराकिरी; मुंबईनं हरवलं!

धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची पुन्हा हाराकिरी; मुंबईनं हरवलं!

Subscribe

कॅप्टन धोनीच्या उपस्थितीत वाघ वाटणारी चेन्नई सुपर किंग्जची टीम त्याच्या अनुपस्थितीत शेळी कशी होते, याचा प्रत्यय शुक्रवारी चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिमवर आला. घरचं मैदान असून देखील चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर देखील पॉइंट टेबलमध्ये चेन्नईचा नंबर वन कायम असला, तरी मुंबईनं मात्र दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्यातून पुन्हा एकदा सुरेश रैनाच्या कर्णधारपदाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

कॅप्टन धोनी तापामुळे शुक्रवारच्या सामन्याला मुकल्यानंतर कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाच्या हातात आली. घरच्या मैदानावर टॉस जिंकून रैनानं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय फारसा यशस्वी ठरला नसल्याचं पहिल्या पॉवरप्लेमध्येच सिद्ध झालं. मुंबईच्या टॉप ऑर्डरनं चेन्नईच्या बॉलिंगवर जोरदार प्रहार केला. सलामीलाच आलेल्या कॅप्टन रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या दोघांनी पहिल्या ओव्हरपासून आक्रमक बॅटिंग केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये क्विंटन डिकॉक चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला, तेव्हा चेन्नईच्या बॉलर्सला हायसं वाटलं. पण पुढच्या ९ ओव्हर रोहित शर्मा आणि एविन लेविस या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७५ रनांची पार्टनरशीप केली. लेविस सँटनरच्या बॉलिंगवर आऊट झाला तेव्हा टीमचा स्कोअर होता ९९ रनांवर २ विकेट.

- Advertisement -

यादरम्यान कॅप्टन रोहित शर्मा एका बाजूने तंबू रोवून रन काढत होता. लेविसनंतर आलेला हार्दिक पांड्या अवघ्या एका धावेवर माघारी परतला. तोपर्यंत रोहित शर्माने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता रोहित शर्मा(६७) शेवटच्या ओव्हर्समध्ये वेगाने धावा काढेल, या आशेवर बसलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची निराशा झाली. १७व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सँटनरनं रोहित शर्माला मुरली विजयकडे झेल द्यायला भा पाडलं. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डनं शेवटच्या ओव्हरमध्ये वेगाने रन बनवण्याचा प्रयत्न केला. अखेर २० ओव्हरमध्ये मुंबईचा डाव फक्त १५५ रनांवर आटोपला.

१५६ रनांचं लक्ष्य समोर असताना चेन्नईची सुरुवात आक्रमक होईल असा अंदाज होता. पण झालं उलटंच! पहिल्याच ओव्हरमध्ये मलिंगानं धोकादायक वॉटसनला अवघ्या ८ रनांवर माघारी धाडलं. तर चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर हार्दिक पांड्यानं कॅप्टन सुरेश रैनाला उमेश यादवकडे झेल द्यायला भाग पाडलं. यावेळी चेन्नईचा स्कोअर होता अवघ्या २२ रनांवर २ विकेट. पुढच्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्यानं अंबाती रायुडुला क्लीन बोल्ड केलं. रायुडु शून्यावर आऊट झाल्यानंतर हार्दिक पांड्याचा पुढचा बळी ठरला केदार जाधव. ६ रनांवर केदार जाधवला देखील पांड्यानं परतीचा रस्ता धरायला लावला. चेन्नईची टॉप ऑर्डर पार विस्कटली असताना सलामीवीर मुरली विजयनं मात्र एक बाजू लावून धरली होती. दहाव्या ओव्हरमध्ये अनुकूल रॉयनं ध्रुव शौरीला ८ रनांवर माघारी धाडलं, तेव्हा चेन्नईचा स्कोअर १० ओव्हर ६० रन आणि ५ विकेट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -