घरमुंबईअंबानींमध्ये फूट, वडील काँग्रेस तर चिरंजीव भाजपच्या पाठिशी

अंबानींमध्ये फूट, वडील काँग्रेस तर चिरंजीव भाजपच्या पाठिशी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईच्या सभेला मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत अंबानी यांची उपस्थिती होती. यावरुन अंबानी कुटुंब यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे की भाजपला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक अंबानी कुटुंब यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे की भाजपला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबानींचे तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांची पाटराखण केली असताना आज मात्र त्यांचा पुत्र अनंत अंबानी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतला असल्याचे दिसून आले आहे.

मोदींचे भाषण ऐकायला आलो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत वांद्रे येथे सभा होती. या सभेला अनंत अंबानी यांनी देखील उपस्थिती लावली होती. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकायला आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे’, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाच्या वृत्तवाहिनीला दिली आहे.

- Advertisement -

मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. मिलिंद देवरा हे मुकेश अंबानी यांच्या जिओ या टेलिकॉम नेटवर्कच्या कॅम्पेनशी संबंधित होते, असे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -