घरक्रीडा'मुंबई जिंकली कारण त्यांनी एक चूक कमी केली' - धोनी

‘मुंबई जिंकली कारण त्यांनी एक चूक कमी केली’ – धोनी

Subscribe

आपल्या शांत स्वभावासाठी परिचित असलेला धोनी एखादा विजय किंवा पराभव झाला तरी आपल्या स्वभावापासून ढळत नाही. याचाच प्रत्यय रविवारी झालेल्या IPL 2019 Final Match नंतर देखील आला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंगने मोक्याच्या क्षणी काही चुका केल्या, त्यामुळे त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. Indian Premier League चे चौथे जेतेपद पटकावण्याचा पहिला मान देखील चेन्नईला मिळवता आला नाही. शेन वॉट्सनच्या दमदार ८० धावांच्या खेळीनंतरही चेन्नईला आपल्या नावावर जेतेपद कोरता आले नाही.

रविवारी अंतिम सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मजेशीर प्रतिक्रिया दिली. “आमच्या दोन्ही संघात होणारे अंतिम सामने मजेशीर होत आहेत. आम्ही एकमेकांना आळीपाळीने आयपीएलची ट्रॉफी देत आहोत.”, असे वक्तव्य धोनीने केले. मुंबईच्या विजयाबाबत बोलताना धोनी म्हणाला की, “मुंबई जिंकली कारण त्यांनी आमच्यापेक्षा एक चुक कमी केली. सामना सुरु असताना दोन्ही संघानी चुका केल्या. मात्र जिंकणारा संघ हा पराभूत संघापेक्षा एक चुक कमीच करत असतो.”

- Advertisement -

अंतिम सामन्यातील आपल्या संघाच्या प्रदर्शनाबाबत धोनी म्हणाला की, ‘आमच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. आम्ही मुंबईला १५० पेक्षा कमी धावांमध्ये रोखले. मात्र आम्ही चांगली बॅटींग केली असती तर जिंकलो असतो. मात्र आता यापुढे आमचे पुर्ण लक्ष हे वर्ल्ड कपवर असणार आहे.’

आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंगची बॅटिंगची भिस्त धोनीवरच होती. सलामीवीर फॅफ डू प्लेसी, शेन वॉट्सन यांचा फॉर्म प्ले ऑफच्या सामन्यात आला. तोपर्यंत धोनी एकटाच चेन्नईसाठी बॅटिंग करत होता. या हंगामात सुरेश रैना, अंबाती रायडू आणि केदार जाधव यांना सूरच गवसला नाही. धोनी म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग या हंगामात चांगले क्रिकेट खेळू शकली नाही, तरिही आम्हाला हा हंगाम चांगला गेला. मात्र यापुढे आता आम्हाला आमच्या खेळाबद्दल नक्कीच विचार करावा लागेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -