घरक्रीडामलेशिया ओपन २०१८; पी. व्ही. सिंधुची सेमी फायनलमध्ये धडक

मलेशिया ओपन २०१८; पी. व्ही. सिंधुची सेमी फायनलमध्ये धडक

Subscribe

पी. व्ही. सिंधुने मलेशिया ओपन २०१८च्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारच्या या लढतीत सिंधुने कॅरोलिन मरीनवर २२-२०, २१-१९ अशी मात केली आहे.

भारताची बॅटमिंटन पट्टू पी. व्ही. सिंधुने मलेशिया ओपन २०१८च्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. पारंपरिक कडवी प्रतिस्पर्धी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिन मरिनवर शानदार विजय मिळवत पी. व्ही. सिंधुने मलेशियन ओपन २०१८च्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारच्या या लढतीत सिंधुने कॅरोलिन मरीनवर २२-२०, २१-१९ अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. मरीनचा पराभव केल्यानंतर सिंधु समोर मुख्य आव्हान असणार आहे ते चीनच्या ताय त्झू यिंगचे. शनिवारी होणाऱ्या लढतीत आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॅरोलिन मरीनवर विजय मिळवल्यानंतर पी. व्ही. सिंधुच्या मनोधौर्यामध्ये वाढ झालेली असणार हे नक्की! त्याचाच फायदा हा सिंधुला चीनच्या ताय त्झू यिंगच्या विरोधातील लढतीमध्ये होणार आहे. त्यामुळे शनिवारच्या या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कॅरोलिन मरीन आणि पी. व्ही. सिंधु समोर आल्या होत्या . त्यावेळी पी. व्ही. सिंधुवर मात करत कॅरोलिन मरीनने गोल्ड मेडल पटकावले होते. पण, ऑलिम्पिकमधील या पराभवाचा वचपा


काढत २०१७च्या इंडियन ओपनमध्ये पी.व्ही .सिंधुने कॅरोलिन मरीनवर मात केली होती आणि सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -