घरICC WC 2023पाकिस्तानने तोडले अकलेचे तारे! भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू म्हणत ICC कडे केली...

पाकिस्तानने तोडले अकलेचे तारे! भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू म्हणत ICC कडे केली ‘ही’ मागणी

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय संघाने विश्वचषकात चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताने आतापर्यंतचे सर्वच्या सर्व 7 सामने जिंकले  आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सातव्या सामन्यात भारतीय संघाने 302 धावांनी पराभव करत मोठा विजय साजरा करत केला. यासह भारतीय संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहचला आहे आणि उपांत्य फेरीतही धडक मारली आहे. परंतु भारतीय गोलंदाजांनी श्रीलंका संघाला 55 धावांवर रोखल्यानंतर आता त्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू दिला जातो, असे म्हणत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने आयसीसीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. (Pakistan broke Akles stars Calling Indian bowlers a different ball Hasan Raza demanded to Icc)

हेही वाचा – World Cup 2023 : गुणतालिकेत टीम इंडिया पुन्हा नंबर वन; इतर संघाची काय स्थिती? वाचा-

- Advertisement -

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने 5 विकेट घेतल्या तर, मोहम्मद सिराजने 3 खेळाडूंना बाद केले. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू हसन रझा याने प्रश्न उपस्थित केले आहेत. एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना हसन रझा म्हणाला की, यावर्षी अनेक गोष्टी भारताच्या बाजूने गेल्या आहेत. मग ते रिव्यू असो किंवा आणखी काही. मोहम्मद शमी आणि सिराजची गोलंदाजी पाहा. आम्ही पण एकेकाळी खेळायचो. तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. पण इथे काही तरी वेगळे होत आहे? मला असे वाटते की चेंडू बदलला जात आहे. आयसीसी त्यांना चेंडू देत आहे की, बीसीसीआय त्यांना देत आहे हे माहित नाही. परंतु आयसीसीने याठिकाणी काय चालले आहे ते पहावे, अशी मागणी हसन रझा यांनी केली आहे.

- Advertisement -

खरंच हा क्रिकेट शो आहे का?

हसन रझा यांच्या या वक्तव्यावर भारतीय समालोचक आकाश चोप्राने खिल्ली उडवली आहे. तो म्हणाला की, हा खरंच क्रिकेट शो आहे का? आणि नसेल तर कुठेतरी इंग्रजीत ‘कॉमेडी’चा उल्लेख करा. कदाचित तुम्ही ते उर्दूमध्ये कुठेतरी लिहिले असेल, पण दुर्दैवाने मी पाहू शकत नाही.

हेही वाचा – IND vs SL : भारताचा विजयाचा सत्ते पे सत्ता; श्रीलंकेचा 302 धावांनी केला पराभव

भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी

दरम्यान, मायदेशात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. खास करून गोलंदाज. मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह अशी नावे आहेत. ज्यांनी जवळपास प्रत्येक सामन्यात अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर संघात संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने केवळ 3 सामने खेळताना 14 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय बुमराहने आतापर्यंत 7 सामन्यात 15, कुलदीप यादवने 10 आणि मोहम्मद सिराजने 9 विकेट्स घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -