घरक्रीडाPSL : खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायचे नाही; PSL वरून रमीझ राजा यांचा संघमालकांशी...

PSL : खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायचे नाही; PSL वरून रमीझ राजा यांचा संघमालकांशी वाद

Subscribe

आयपीएलच्या आधारावर पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे

आयपीएलच्या आधारावर पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रिकेटपटूंच्या पगारावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा आणि पीएसएलमधील संघांचे मालक यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे. हा वाद तेव्हा घडला आहे जेव्हा पाकिस्तान सुपर लीगचा सातवा हंगाम काही महिन्यांच्याच अंतरावर आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सुपर लीगच्या बाबतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि फँचायझीमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीत फँचायझींच्या पगारावरून मोठा वाद झाला होता.

लक्षणीय म्हणजे या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी फ्रँचायझीने आपल्या पगाराची मर्यादा वाढवावी असा प्रस्ताव मांडला ज्यावर फ्रँचायझीने प्रश्न उपस्थित केले. दरम्यान रमीज राजा यांनी हे देखील सांगितले की फँचायझींच्या या वागणुकीमुळेच विदेशी खेळाडू पीएसएलमध्ये भाग घेत नाहीत. माहितीनुसार राजा यांनी म्हंटले की, पगार कमी असल्यामुळे विदेशी खेळाडू इथे येत नाहीत. याच्यावर फँचायझीच्या एका मालकाने सांगितले की कित्येक विदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळायलाच तयार नाहीत.

- Advertisement -

दरम्यान सध्या पीसीएलच्या संघातील खेळाडूंची पगाराची मर्यादा ०.९५ मिलियन डॉलर आहे. तर रमीज राजा यांनी सांगितले की याच्यात वाढ करून १.२ मिलियन डॉलर केले पाहिजे. मात्र या जोरदार वादानंतरही रमीझ राजा यांना त्यांची बाजू पुढे करता आली नाही आणि सर्व संघांनी आपली बाजू मांडली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये एकूण ६ संघ आहेत, यामध्ये पेशावर, लाहोर, कराची, क्वेटा, इस्लामाबाद आणि मुलतान या संघांचा समावेश आहे.


हे ही वाचा: http://IND vs NZ 1stTest: श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास; असे करणारा पहिला भारतीय खेळाडू

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -