घरक्रीडारोहितची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

रोहितची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

Subscribe

भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत कुलदीप यादवने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

भारताला आशिया चषक मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवण्याची ही रोहितची दुसरी वेळ आहे. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत कुलदीप यादव तिसऱ्या स्थानी गेला आहे.

आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांत रोहित दुसरा 

नुकतेच संपलेल्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानी होता. त्याने या स्पर्धेत ३१७ धावा केल्या होत्या. ज्यात एका शतकाचा समावेश होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने १११ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याने क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ८४४ गुण आहेत. तर त्याचा सलामीचा साथी शिखर धवन ५ व्या स्थानी गेला आहे. त्याच्या खात्यात ८०२ गुण आहेत. आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी होता. तर भारताचा कर्णधार विराट कोहली ९११ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

कुलदीपची क्रमवारीत झेप

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला तीन स्थानांची बढती मिळाली आहे. त्यामुळे गोलंदाजांच्या यादीत त्याने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ७०० गुण आहेत. कुलदीपने आशिया चषकाच्या ६ सामन्यांत १० विकेट घेतल्या होत्या. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे. बुमराहच्या खात्यात ७९७ गुण आहेत.
सौ – Cricinfo
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -